आजकाल, बहुतेक लोकांकडे स्मार्टफोन आहे. हे स्मार्टफोन इंटरनेटशी जोडलेले असते. अशा परिस्थितीत, स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा धोका निर्माण होत असतो, जो बँकिंग फसवणुकीसारख्या घटनांचे कारण बनू शकतो. अशा वेळी तुम्हाला व्हायरसच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. तथापि, व्हायरसच्या बाबतीत सर्वात मोठी समस्या ही आहे की ते ओळखणे फार कठीण आहे. अनेकदा लोकांच्या स्मार्टफोनमध्ये अनावश्यक व्हायरस आलेला असतो आणि त्यांना ठाऊकही नसते. मात्र, आम्ही तुम्हाला काही खास गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर आहे की नाही ओळखता येते. या टिप्सचा वापर करून तुम्ही फोनमधील मालवेअर अथवा व्हायरस ओळखू सहज ओळखू शकता.
फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस आहे की नाही ते कसे तपासायचे?
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
स्मार्टफोनचा कमी वेग
जेव्हा तुम्ही स्मार्टफोन वापरता तेव्हा अनेक वेळा तुमच्या लक्षात येते की स्मार्टफोन अचानक थोडा स्लो झाला आहे. टेक्निकल टर्ममध्ये बोलायचे झाले तर फोनची प्रोसेसिंग स्पीड अचानक कमी होतो. याचे कारण व्हायरस असू शकतात. अशा परिस्थितीत अचानक फोनचा वेग कमी झाल्यास लगेच सावध व्हायला हवे.
बॅटरी लवकर संपणे
व्हायरसच्या बाबतीत, असे दिसून येते की फोनची बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते, कारण फोनमध्ये व्हायरस सक्रिय असतो, ज्यामुळे बॅकग्राउंडमध्ये बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते. जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. असे होणे फोनमध्ये व्हायरस असण्याचे लक्षण ठरू शकते.
इंटरनेट लवकर संपणे
जेव्हा फोनमध्ये व्हायरस असतात तेव्हा ते बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे फोनवरील डेटा लवकर संपतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डेटाच्या वापराकडे लक्ष दिले पाहिजे. तुमचा डेटा लवकर संपत असेल ही व्हायरससाठीची लक्षणीय बाब ठरू शकते.
अनावश्यक पॉपअप आणि जाहिराती
तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अनावश्यक पॉप-अप्स बंद केले पाहिजेत, कारण हे फोनमधील मालवेअरसाठी एंट्री पॉइंट असू शकतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या फोनवर अनावश्यक जाहिराती दिसत असतील तर त्या त्वरित बंद कराव्यात.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
फोनला सुरक्षित कसे करावे?