India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पूर्णपणे बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जर हा तणाव आणखी वाढला तर सर्वात आधी सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कारण सध्या सुरु असलेल्या या युद्धाने मोठं रुप धारण केलं तर सर्वात आधी वीज आणि इंटरनेटवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही या स्मार्ट टेक्नोलॉजीच्या काळात एक महत्त्वाचं पाऊल उचललं तर संकटकाळी देखील तुम्हाला विजेचा वापर करता येऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला अशा एका टेक्नोलॉजीबाबत सांगणार आहोत, जी तुमच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी मदत करणार आहे. युद्धादरम्यान जर वीज गेली तर तुम्ही सोलार पॅनलचा वापर करू शकतो. सोलार पॅनल एक असा उपाय आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही युद्धादरम्यान वीज गेल्यास लाईट आणि पंख्याचा वापर करू शकणार आहात. सोलार पॅनलच्या मदतीने तुम्ही इंटरनेट राउटरचा देखील वापर करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोलार पॅनल सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती करतो. यामध्ये कोणत्याही तारांची, डिझेलची किंवा पेट्रोलची गरज नाही. सोलार पॅनलच्या मदतीने वीज तयार करण्यासाठी केवळ सूर्यप्रकाशाची गरज आहे. सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती केल्यानंतर तुम्ही या वीजेवर पंखा, बल्ब, मोबाइल चार्जर आणि इंटरनेट राउटर देखील वापरू शकता.
युद्धादरम्यान सुरक्षेच्या कारणांसाठी वीज पुरवठा थांबवला जाऊ शकतो. अशावेळी ज्या घरांमध्ये सोलार पॅनल लावण्यात आले असतील, तिथे पंखा आणि लाईटचा वापर केला जाऊ शकतो. याच्या मदतीने तुम्ही काही काळासाठी फ्रीज देखील सुरु ठेऊ शकता. ज्यामुळे फ्रीजमधील भाजीपाला आणि इतर अन्नपदार्थ खराब होणार नाहीत.
जर तुम्ही सोलार पॅनल लावण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला 45,000 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. तुम्ही 1KW चे सोलर सिस्टम 45,000 ते 80,000 रुपयांदरम्यान खरेदी करू शकता. ज्यामध्ये बॅटरी, इन्वर्टर आणि इंस्टॉलेशन यांचा समावेश आहे.