MWC 2025: आश्चर्यच! आता सोलार एनर्जीवर चालणार तुमचा स्मार्टफोन, चार्जिंगचीही गरज नाही! Infinix ने सादर केलं अनोखं तंत्रज्ञान
स्मार्टफोन कंपनी Infinix ने इंडोनेशियामध्ये Infinix Note 50 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मार्च 2024 मध्ये लाँच केलेल्या Infinix Note 40 सीरीजची जागा घेणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने बार्सेलोनामध्ये सध्या सुरु असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2025) मध्ये E-Color Shift 2.0 आणि SolarEnergy-Reserving टेक्नोलॉजी सादर केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.
SolarEnergy-Reserving टेक्नोलॉजी डिवाइस चार्जिंगसाठी सभोवतालच्या प्रकाशाचा वापर करते. त्यामुळे आता तुम्हाला स्मार्टफोन चार्जिंगसाठी विजेचा नाही तर सूर्यप्रकाशाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बॅटरीचे आयुष्य आणखी चांगले राहिले असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने यापूर्वी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2024) मध्ये E-Color Shift तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले होते. नवीनतम E-Color Shift 2.0 मध्ये, कंपनीने AI आधारित कस्टमायझेशन सपोर्ट प्रदान केला आहे. (फोटो सौजन्य – X)
Infinix ने MWC मध्ये SolarEnergy-Reserving Technology ने सुसज्ज फोन केस प्रदर्शित केला आहे. Infinix चा दावा आहे की यामुळे डिव्हाइसची बॅटरी लाइफ वाढण्यास मदत होईल. यामध्ये कंपनीने प्रगत पेरोव्स्काईट फोटोव्होल्टेइक तंत्रज्ञान आणि AI चा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान प्रकाश उर्जेचे ऑप्टिमायझेशन करून डिवाइस चार्ज करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे तुम्हाला विजेचा वापर करण्याची गरज नाही.
Infinix Unveils Tech at MWC 2025
Infinix introduced solar charging tech for smartphones and a solar-powered case for eco-friendly charging
They also showcased E-Color Shift 2.0, allowing phones to change back panel colors and patterns dynamically pic.twitter.com/Gvs57M4AZs
— Utsav Techie (@utsavtechie) March 3, 2025
इन्फिनिक्सच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या फोनच्या मागील बाजूस एक सौर पॅनेल बसवले आहे, ज्याला कंपनीने सोलरएनर्जी-रिझर्व्हिंग तंत्रज्ञान असे नाव दिले आहे. हे पेरोव्स्काईट सोलर सेल्स वापरते जे नियमित सिलिकॉन-आधारित सोलर पॅनल्सपेक्षा पातळ, अधिक किफायतशीर आहे.
कंपनी म्हणते की त्यांची SolarEnergy-Reserving Technology घरातील आणि बाहेरील प्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करते आणि ते प्रोटोटाइप फोन केसमध्ये साठवते. हे केस डायरेक्ट कनेक्ट पॉइंटवरून हेडसेटमध्ये पॉवर ट्रान्सफर करेल. कंपनी म्हणते की ते AI-आधारित अल्गोरिदम वापरून रिअल टाइममध्ये फाइन-ट्यूनिंग करून पॉवर ट्रान्सफर करेल. हे केस 2W पर्यंत वीज साठवेल. कंपनीचे म्हणणे आहे की भविष्यात ती एनर्जी स्टोरेज क्षमता वाढवली जाणार आहे.
Infinix म्हणते की त्यांची ‘सनफ्लावर’ वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी हेलिओट्रॉपिक योजनेवर आधारित आहे. ते इंडोर लाइटिंग कंडिशनसोबत डायनामिकली एडजेस्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की भविष्यात ते या तंत्रज्ञानाचा वापर वीयरेबल्स आणि डिजिटल डिवाइसेसमध्ये करेल.
E-Color Shift 2.0 टेक्नोलॉजीच्या मदतीने, फोनच्या मागील पॅनलचे रंग बॅटरीचा वापर न करता बदलतील. Infinix चे म्हणणे आहे की ही नवीनतम तंत्रज्ञान AI च्या मदतीने यूजर्सच्या पसंती आणि बाह्य उत्तेजनांवर आधारित रंग बदलेल. कंपनीने असेही म्हटले आहे की वापरकर्त्यांना सहा डायनॅमिक पॅटर्न आणि 6 कलर प्लेट्समधून निवडण्याचा पर्याय मिळेल. AI च्या मदतीने, ते 30 यूनीक कॉम्बिनेशन तयार करेल, जे मागील पॅनेलवर दिसतील. हे रंग हवामान, वॉलपेपर आणि परिसरावर आधारित असतील.