Women’s Day 2025: बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हणजे Linda Yaccarino; हाती घेतली X ची जबाबदारी अन् सर्वच पालटलं
2023 पर्यंत X आणि टेस्लाचा मालक एलोन मस्क यांनी X च्या सिईओ पद संभाळलं. मात्र त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी एका महिलेला X च्या सिईओ पदावर नियुक्त केलं. हि महिला म्हणजे Linda Yaccarino. 5 जून, 2023 रोजी Linda Yaccarino यांना X च्या सिईओ पदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर X चं चित्रच पालटलं. आधीपासून लोकांच्या मनावर राज्य करणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स लोकांच्या घराघरात पोहोचला. इतकचं नाही तर एक्समध्ये अनेक बदल देखील करण्यात आले, ज्यामुळे युजर्सना त्याचा वापर करणं सोपं होईल.
एलोन मस्कने एक्सच्या सिईओ पदाची कमान सोपवलेली Linda Yaccarino बद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे यंदाच्या महिला दिनानिमित्त बेस्ट महिला सीईओपैकी एक असणाऱ्या Linda Yaccarino बद्दल आपण जाणून घेऊया. तिचा आतापर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. आज आणण Linda Yaccarino च्या याच प्रवासाबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
5 जून, 2023 रोजी एलोन मस्क यांनी X ची कमान एका महिलेकडे सोपवली. ही महिला म्हणजे Linda Yaccarino. एलोन मस्कने X वरील त्याच्या पदाचा राजीनामा दिला आणि Linda Yaccarino ने ही जबाबदारी स्विकारली. Linda Yaccarino 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये आहे. ती कंपनीच्या ग्लोबल एड अँड पार्टनरशिपच्या अध्यक्ष म्हणून काम करते. Linda Yaccarino ही एनबीसी युनिव्हर्सलमध्ये टॉप एडवरटाइजिंग सेल एग्जीक्यूटिव आहे. याआधी Linda मनोरंजन आणि डिजिटल जाहिरात डिपॉर्टमेंटमध्येही काम करत होती.
Linda ने टर्नरमध्ये 19 वर्षे काम केले आहे. जिथे तिने कार्यकारी उपाध्यक्ष, सीईओ, विज्ञापन हेड आणि अधिग्रहण हेड म्हणून काम केले आहे. तिने पेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. येथे तिने लिबरल आर्ट्स आणि टेलि कम्युनिकेशनचा अभ्यास केला आहे. Linda Yaccarino ने सिईओची पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर अनेक बदल करण्यात आले. युजर्ससाठी अनेक नवीन अपडेट्स आणि फीचर्स लाँच करण्यात आले. ज्यामुळे बघता बघता X च्या युजर्सची संख्या देखील प्रचंड वाढली. त्यामुळे Linda Yaccarino ला बेस्ट महिला सीईओपैकी एक म्हटलं जातं. असं देखील सांगितलं जात की, X ची परिस्थिती अत्यंत खालावली होती. मात्र Linda Yaccarino ने केलेल्या बदलांमुळे X पुन्हा नावारुपाला आला.
बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, Linda Yaccarino ने तिच्या मैत्रिणीला X ची सीईओ बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. तिने अनेक वेळा एलोन मस्कच्या धोरणांचे कौतुक केले आहे आणि ती त्यांची समर्थक आहे.
2022 मध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने पराग अग्रवाल यांना सीईओ पदावरून काढून टाकले. यानंतर मस्कने काही काळ स्वत: X च्या सिईओ पदाची जबाबदारी हाती घेतली. त्यानंतर 5 जून, 2023 रोजी Linda Yaccarino यांना X च्या सिईओ पदाची जबाबदारी देण्यात आली.