रोलआउट झाले iOS 26 अपडेट! कसं कराल डाउनलोड आणि कोणत्या iPhones ना मिळणार नवे फीचर्स? जाणून घ्या सर्वकाही
गेल्या आठवड्यात टेक जायंट कंपनी अॅपलने त्यांचा 2025 मधील सर्वात मोठा ईव्हेंट आयोजित केला होता. हा ईव्हेंट Awe Dropping या नावाने आयोजित करण्यात आला होता. कंपनीने या ईव्हेंटमध्ये त्यांचे अनेक प्रोडक्ट्स लाँच केले. ज्यामध्ये नव्या iPhone 17 सीरीजसह इतर गॅझेट्सच समावेश आहे. आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंगनंतर आता कंपनीने iOS 26 अपडेट ग्लोबल लेवलवर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने 15 सप्टेंबरच्या रात्रीपासून कम्पेटिबल डिव्हाईससाठी हे नवीन अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये मोठे डिझाइन बदल, नवीन एआय वैशिष्ट्ये आणि प्रायवसी वैशिष्ट्य अपग्रेड समाविष्ट आहेत, ज्यामुळे ते गेल्या काही वर्षांमध्ये Apple कडून मिळालेल्या सर्वात मोठ्या iOS अपग्रेडपैकी एक बनले आहे. असं सांगितलं जात आहे की, या अपडेटमुळे युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. युजर्सना फोन वापरताना आता अधिक मजा येणार आहे. कंपनीने हे अपडेट काही निवडक आयफोन मॉडेल्ससाठी लाँच केले आहे. यासंबंधित एक लिस्ट देखील जारी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अशी माहिती मिळाली आहे की, Apple ने यावर्षी जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या WWDC 2025 मध्ये पहिल्यांदा हे नवीन अपडेट सादर केले होते. अनेक महिन्यांच्या चाचणीनंतर, कंपनीने अखेर त्याचे स्थिर अपडेट सादर केले आहे. प्रथम जाणून घेऊया की कोणत्या आयफोन मॉडेल्सना हे अपडेट मिळेल…
कंपनीने या या नवीन iOS 26 अपडेटमध्ये नवीन डिझाइन लँग्वेज, Apple इंटेलिजेंस फीचर्स आणि अधिक चांगले प्राइवेसी टूल ऑफर केले आहेत. यावेळी या अपडेटमध्ये खास लिक्विड ग्लास थीम आहे, जो इंटरफेस में लिक्विड एनिमेशन आणि डेप्थ इफेक्ट ऑफर करते. यासोबतच लॉक स्क्रीन क्लॉक आता वॉलपेपरनुसार Dynamically Optimized होतो, अधिक रिफाइंड लूकसाठी नवीन डिझाइन केलेले अॅप आयकॉन हलक्या आणि गडद रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
iOS 26 अपडेट डाउनलोड करण्यासाठी युजर्सना सर्वात आधी Settings > General > Software Update मध्ये जावे लागणार आहे. यानंतर डाउनलोड आणि इंस्टॉलवर क्लिक करावं लागणार आहे. यानंतर नवीन ओएस अपडेट सुरू होईल. तथापि, यासाठी तुमच्या डिव्हाइसमध्ये पुरेसे स्टोरेज आणि चांगले वाय-फाय कनेक्शन असणे आवश्यक आहे.