शेतकऱ्यांना आले अच्छे दिन, आयोटेकवर्ल्ड आणि इफकोच्या भागीदारीमुळे कृषी उत्पादनात झाली वाढ
भारतातील आघाडीची ड्रोन तंत्रज्ञान कंपनी आयोटेकवर्ल्ड एविगेशन आणि एक प्रमुख सहकारी संस्था इफको यांच्या भागीदारीमुळे डिसेंबर २०२३ पासूनच्या केवळ ८ महिन्यांत ११ भारतीय राज्यांतील ५०० पेक्षा जास्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. या भागीदारीतून ५०० ड्रोन शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी समर्पित केले गेले आहेत. या उपक्रमाचा उद्देश शेती पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणणे आणि भारतातील शेतीला प्रोत्साहन देणे असा आहे.
नुकतीच आयोटेकवर्ल्ड आणि इफको यांनी ‘एग्रीबोट’ ड्रोन ग्राहकांसाठी एक विशेष मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर केली आहे, ज्यात शेतकरी आणि सेवा प्रदात्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. या अनन्य प्रोत्साहन योजनेअंतर्गत इफको ‘एग्रीबोट’ ड्रोन कोणत्याही एकर मर्यादेशिवाय देत आहे, ज्यामुळे सहभागी शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होऊ शकतो. या उपक्रमाचा उद्देश ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये व्यापक वापर करण्यास प्रोत्साहन देणे, कार्यक्षमता वाढवणे आणि पीक व्यवस्थापन सुधारणे तसेच खर्च कमी करणे आहे.
हे देखील वाचा: चांद्रयान -3 ने उलघडली चंद्राची नवीन रहस्ये; प्रज्ञान रोव्हरने पाठवली खास छायाचित्रे
‘एग्रीबोट एमएक्स’ जो भारताचा क्रमांक 1 कृषी ड्रोन म्हणून ओळखला जातो त्यात विशेषत: कृषी उपयोगासाठी डिझाईन केलेली आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. हे शक्तिशाली 25200 एमएएच लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज असून प्रति बॅटरी सेट 1500 एकर पर्यंत कव्हर करण्यास सक्षम आहे. ड्रोनची फवारणी क्षमता प्रति तास ६ एकर पर्यंत आहे, एकाधिक बॅटरी संच वापरून दररोज २५ एकर कव्हर करण्याची क्षमता आहे.
आयोटेकवर्ल्ड आणि इफको यांच्यातील या कराराचे उद्दिष्ट ३० लाख एकर शेतजमीन कव्हर करण्याचे आहे यात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, जम्मू-कश्मीर, मध्य प्रदेश आणि बिहार यासह अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या शेतजमिनीचा समावेश आहे.
आयोटेकवर्ल्ड एविगेशन चे सह-संस्थापक अनुप उपाध्याय म्हणाले, “भारतीय शेतीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्यात आमची भागीदारी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. केवळ ८ महिन्यांत मिळालेल्या प्रतिसादाने आणि प्रभावाने आम्ही अतिशय उत्साही आहोत. आमचे ‘एग्रीबोट’ ड्रोन भारतीय शेतकऱ्यांच्या आव्हानांना ध्यानात घेऊन काटेकोरपणे डिझाइन केले आहेत.”