मोबाईल कंपन्यांमध्ये ॲपलचे नाव उच्च स्तरावर आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी दरवर्षी अनेक नवनवीन डिव्हाइस लाँच करत असते. यातील ॲपलची मोबाईल सिरीज प्रत्येक वर्षी एक चर्चेला विषय असते. कंपनीने नुकतीच आपली iPhone 16 लाँच केली, जिला युजर्सने भरभरून प्रतिसाद दर्शवला. त्यांनतर आता ॲपलच्या iPhone 17 सिरीजची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ॲपलच्या (Apple) आगामी iPhone 17 सीरीजच्या बातम्या आता येऊ लागल्या आहेत. या सिरीजमधील सर्वात मोठे अपडेट म्हणजे प्लस प्रकार लाँच करण्याऐवजी, कंपनी नवीन स्लिम/एअर मॉडेल लाँच करू शकते. यासोबतच कंपनी नेक्स्ट जेन सीरीजमध्ये AI ची व्याप्ती वाढवू शकते आणि त्यात काही मोठे बदल देखीलदिसून येऊ शकतात. याबाबत जे काही डिटेल्स समोर आले आहेत त्याबाबत आज पण या लेखात चर्चा करणार आहोत.
खूप कामाची आहे Flipkart ची VIP मेंबरशिप! मिळतात अनेक फायदे, अशा प्रकारे करू शकता अप्लाय
iPhone 17 चे डिजाइन
अहवालात म्हटले आहे की, आयफोन 17 सिरीजमध्ये पूर्णपणे नवीन कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्याची रचना 16 सिरींजपेक्षा खूपच स्लिम असेल. रेंडर इमेजवरून समजते की, यात कॅमेरा सेन्सरसाठी शीर्षस्थानी पिक्सेल सारखी हॉरिजॉन्टल पट्टी दिली जाईल. यावरून समजते की, यात कॅमेरा लेन्सची अरेंजमेंट काहीशी वेगळी असणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनी या सीरिजसाठी संपूर्ण नवीन डिझाइन आणण्याची योजना आखत आहे. यामध्ये फेस आयडी सेन्सरही दिला जाऊ शकतो. ॲपलच्या पुढील सीरिजची रचना आधीच्या आयफोनपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल अशी अपेक्षा आहे.
ॲल्युमिनियम बॉडी
सीरिजचे टॉप एंड मॉडेल, iPhone 17 Pro Max, Dynamic Island सह एंट्री करेल. अहवालानुसार, प्रो मॉडेल टायटॅनियम बॉडीऐवजी ॲल्युमिनियम बॉडीसह येऊ शकते. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये असे नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. सध्या, या सिरींजबद्दल फार काही अपडेट्स समोर आलेले नाहीत, त्यामुळे हे अहवाल अचूक मानले जाऊ शकत नाहीत.
WhatsApp Hack: तुमचे प्रायव्हेट मेसेज कोणी वाचत तर नाही? व्हॉट्सॲप हॅक झाले की नाही असे शोधता येईल
लाँचची शक्यता?
ॲपलच्या सिरीजशी संबंधित स्पेक्सचे तपशील सामान्यतः महिन्यापूर्वी ऑनलाइन दिसू लागतात. आयफोन 17 मध्ये देखील हेच घडत आहे. अलीकडे, आयफोन 16 सिरीजची एंट्री झाली आहे, त्यामुळे यानंतर आयफोन 17 बद्दलचे तपशील लवकरच येऊ लागले. त्याच्या लाँचबद्दल बोलायचे तर, यासाठी अजून फार वेळ आहे. दरवेळेप्रमाणेच पुढील वर्षीही सप्टेंबरमध्ये ही सिरीज लाँच होणार आहे. याआधी कंपनी इतर अनेक डिव्हाइस लाँच करू शकते.