Realme P3 Lite 5G: 10 हजारांहून कमी किंमतीत Realme ने नवा Smartphone; 5G कनेक्टिव्हिटी आणि मिलिट्री-ग्रेड बॉडीने सुसज्ज
Realme ने भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे, ज्याची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. कंपनीने हा स्मार्टफोन Realme P3 Lite 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसचा समावेश P3-सीरीजमध्ये करण्यात आला आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने आधीच P3 आणि P3 Ultra हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने या स्मार्टफोनमध्ये आणखी एका स्मार्टफोनचा समावेश केला आहे.
कंपनीने लाँच केलेला हा बजेट स्मार्टफोन 6,000mAh बॅटरी ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट आणि 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंससाठी हा स्मार्टफोन IP64 सर्टिफाइड आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Realme P3 Lite 5G स्मार्टफोन 4GB रॅम+ 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या बेस 4GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन Realme इंडिया वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठी सुरु होणार आहे. ब्रँड 1,000 रुपयांची इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील देत आहे, ज्यामुळे 4GB रॅम व्हेरिअंटची प्रभावी किंमत 9,499 रुपये आणि 6GB रॅम व्हेरिअंटची किंमत 10,499 रुपये झाली आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme P3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये ‘लिली इंस्पायर्ड डिझाइन’ देण्यात आली आहे, ज्यामध्ये पेटल टेक्सचर आहे. कंपनीने हा स्मार्टफोन लिली व्हाइट, पर्पल ब्लॉसम आणि मिडनाइट लिली कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. फोनचे वजन 197 ग्राम आहे आणि थिकनेस 7.94mm आहे. डिव्हाईसमध्ये आर्मरशेल टफ बिल्ड आणि मिलिट्री-ग्रेड शॉक रेजिस्टेंस टेस्ट सर्टिफिकेशन आहे, जो 2 मीटर फॉल प्रोटेक्शन क्लेम करते. हा स्मार्टफोन डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंससाठी IP54 रेटिंगसह येतो.
नवीन Realme फोन 6.67-इंचाचा HD+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 1604 x 720 पिक्सेल्स रेजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सँपलिंग रेट आणि 625 निट्सची मॅक्स ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. डिव्हाईस पॅनल रेनवाटर स्मार्ट टचला सपोर्ट करतो, जेणेकरून ओल्या हातांनीही फोन योग्यरित्या वापरता येईल.
Realme P3 Lite 5G मध्ये 6nm MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे, ज्याला 6GB रॅम (+12GB वर्चुअल रॅम) आणि 128GB स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. हा फोन Realme UI 6.0 वर आधारित आहे, जो Android 15 वर बेस्ड आहे आणि या फोनमध्ये iPhone सारखे वॉलपेपर डेप्थ फंक्शन आणि नोटिफिकेशन आणि क्विक सेटिंग्ससाठी वेगवेगळे पॅनल मिळतात.
डिव्हाईस अनेक AI फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे, ज्यामध्ये AI Clear Face (ब्लरी फेसला फिक्स करण्यासाठी), AI Smart Loop (कंटेंट ओळखणे आणि योग्य एक्शन सुचवणे), Google Gemini इंटीग्रेशन, AI स्मार्ट सिग्नल एडजस्टमेंट आणि अनेक फीचर्सचा समावेश आहे. Realme P3 Lite 5G च्या मागील बाजूला 32MP डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. Realme ने असा दावा केला आहे की, डिव्हाईसमध्ये युजर्स 18 तासांपेक्षा जास्त काळ इंस्टाग्राम किंवा 14 तासांपेक्षा जास्त काळ युट्यूब चालवू शकते. फक्त पाच मिनिटांच्या चार्जिंगसह, तुम्ही 4.8 तास कॉलिंग आणि 11 तासांपेक्षा जास्त म्यूजिक प्ले टाइम मिळवू शकता. कंपनी असेही म्हणते की 1,600 चार्ज सायकल (सुमारे चार वर्षे वापरल्यानंतर) देखील बॅटरी 80 टक्क्यांहून अधिक हेल्दी राहील.