IRCTC down: दिवाळीपूर्वीच डाऊन झाले IRCTC अॅप आणि वेबसाईट, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात येतेय अडचण
दिवाळीपूर्वीच इंडियन रेल्वेचे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC चे अॅप आणि वेबसाईट डाऊन झाली आहे. त्यामुळे युजर्सना ऑनलाईन तिकीट बुक करण्यात अडचण येत आहे. आज दुपारच्या सुमारास IRCTC चे अॅप आणि वेबसाईट अचानक डाऊन झाली. त्यामुळे तिकीट बुक केल्या जात नव्हत्या. याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रिनशॉट शेअर करत पोस्ट केली आहे. याशिवाय अनेक युजर्सनी या प्लॅटफॉर्मचे आउटेज रिपोर्ट देखील केले. युजर्सचं असं म्हणणं होतं की, ते IRCTC च्या अॅप आणि वेबसाईटवरून तात्काळ तिकीट बुक करू शकत नाही.
IRCTC च्या वेबसाइट आणि अॅपमधील हे आऊटेज तात्कळ बुकींगच्या वेळी सुरु झाले. यावेळी अनेक युजर्स तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी वेबसाईट अचानक डाऊन झाली आणि युजर्सना तिकीट बुक करण्यात अडचण निर्माण झाली. युजर्सचं म्हणणं होतं की, आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपमधील बिघाडामुळे युजर्स तिकिटे बुक करू शकणार नाहीत. अहवालानुसार वेबसाइट आणि अॅपवरील प्रचंड ट्रॅफिकमुळे ही समस्या उद्भवली आहे, ज्यामुळे युजर्स तिकिटे बुक करू शकले नाहीत.
Dear @IRCTCofficial,
During Tatkal ticket booking hours, your website displayed a “Downtime” message, making it impossible to proceed. Kindly look into this issue and ensure smoother service during peak booking times.
Thank you. pic.twitter.com/ZwfXKExi7D — Nawab Alam 𝕏 (@iamNawabAlam) October 17, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, IRCTC च्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं की, तांत्रिक अडचणींमुळे काही काळ लोकांना तिकिटे बुक करण्यात अडचणी आल्या. याशिवाय त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, त्यांची टीम ही समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. लवकरच, युजर्स आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटद्वारे तिकिटे बुक करू शकतील.
युजर्स सोशल मीडियावर सतत स्क्रिन शॉट शेअर करत आहे. ज्यामध्ये साइट डाउन आणि एररचे मेसेज देखील दिसत आहेत. ऑनलाइन सर्विस आउटेज होण्याचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, 49% युजर्सनी आयआरसीटीसी वेबसाइटवर आणि 37% युजर्सनी त्यांच्या अॅपवर खंडित झाल्याची तक्रार केली. याव्यतिरिक्त, रेल्वे स्थानकांवरून तिकिटे खरेदी करणाऱ्या लोकांनाही ही समस्या येत आहे.
भारतीय रेलवे तिकीट बुकिंगबाबत लवकरच एक नवीन नियम जारी करण्याचा विचार केला जात आहे. हा नवीन नियम रेल्वे प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी तयार केला जाणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीय रेल्वेचे प्रवासी लवकरच कोणतेही रिशेड्यूल शुल्क न भरता त्यांच्या तिकिटांचे वेळापत्रक नंतरच्या तारखेसाठी पुन्हा तयार करू शकतील. म्हणजेच जर तुम्ही 10 जानेवारीसाठी तिकीट बुकींग केली असेल तर तुम्ही हे तिकीट कॅन्सल केल्याशिवाय तुम्ही पुढील तारीखसाठी तिकीट बुक करू शकणार आहात. सध्या, प्रवाशांना त्यांचे तिकिटे पुन्हा रिशेड्यूल करण्याचा पर्याय नाही. त्यांना त्यांचे तिकिटे रद्द करण्याऐवजी पुन्हा बुक करावी लागतील. टिकट कँसिलेशनचे चार्ज देखील द्यावे लागत आहे.