Jio चा एंटरटेनमेंट धमाका! JioHotstar सह फ्री मिळणार 12+ OTT, 2GB डेली डेटा आणि कॉलिंगही FREE; किती आहे किंमत?
तुम्ही देखील जिओ युजर आहात का? जिओच्या स्वस्त आणि चांगले फायदे देणाऱ्या प्लॅनच्या शोधात आहात का? खरं तर भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली जिओ त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच चांगले प्लॅन घेऊन येत असते. जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना इंटरनेट डेटा, कॉलिंग, फ्री ओटीटी असे अनेक फायदे ऑफर केले जातात. काही प्लॅनमध्ये युजर्सना कमी किंमतीत जास्त फायदे मिळतात. त्यामुळे अनेकजण असं मानतात की, जिओचा प्रत्येक प्लॅन बेस्ट आहे.
जिओ त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन प्लॅन्स घेऊन येत असतो. आता देखील जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक विशेष प्लॅन लाँच केला आहे. खरं तर हा प्लॅन म्हणजे एंटरटेनमेंट धमाका आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ डेटा आणि कॉलिंग नाही तर भरपूर मनोरंजन देखील मिळणार आहे. जर तुम्ही देखील अशा एखाद्या प्लॅनच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला कॉलिंगसह, एसएमएस आणि इंटरनेट डेटासोबतच मनोरंजन देखील मिळेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओने त्यांच्या युजर्ससाठी आता असा एक प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये 12 प्लस फ्री ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. एवढंच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉलिंग देखील ऑफर केले जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये इतर अनेक फायदे उपलब्ध आहेत. म्हणजेच हा प्लॅन जिओचा एक मोठा धमाका आहे. चला तर मग या प्लॅनबाबत जाणून घेऊया.
जिओने त्यांच्या युजर्ससाठी 445 रुपयांच्या किंंमतीत एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये 12 हून अधिक ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. म्हणजेच हा प्लॅन जिओचा एंटरटेनमेंट धमाका पॅक आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar सब्सक्रिप्शन, Sony LIV, ZEE5, Liongate Play, Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, FanCode, Hoichoi, JioTV, JioAICloud सारख्या ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे.
एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G सुविधा देखील दिली जात आहे, म्हणजेच, जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे 5G नेटवर्क आहे, तर तुम्ही Jio च्या अमर्यादित 5G चा आनंद घेऊ शकता. म्हणजेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल आणि तुम्हाला डेटाची कमतरता भासणार नाही. तथापि, यासाठी तुमच्याकडे 5G डिव्हाइस असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही Jio ची 5G सेवा वापरू शकाल.