NEET Re-Exam Paper Leak: नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला; रोहित पवारांचा 'गुजरात कनेक्शन'चा दावा
मुंबई : माझ्यावर सत्तेतील काही लोकांनी टीका केली आहे. एफआयआर दाखल करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे; मात्र, सध्या केवळ भाषणं आणि राजकीय टिप्पणीच केल्या जात आहेत. ‘नवीन पर्व सुरू झालं’ असं सांगितलं जात असलं, तरी अजितपर्व कधी संपणारच नाही. एफआयआर झाल्यानंतर तपास होणं अपरिहार्य आहे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि.27) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ यांनी एक महिन्यापूर्वीच रिपोर्ट येणार असल्याचं सांगितलं होतं. आज-उद्या येणारा रिपोर्ट जर थातूरमातूर असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईत मी पत्रकार परिषद घेणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कुठेही अडचण निर्माण होऊ नये, दंगल होऊ नये म्हणून शरद पवार यांनी घातपात नसल्याचं विधान केलं. मात्र, विलीनीकरणाचा विषय जिवंत ठेवण्याचं काम त्यांनीच केलं, असंही रोहित पवार म्हणाले.
हेदेखील वाचा : Ritu Tawde Rolex watch : BMC महापौर रितू तावडे यांचे कोट्यवधींचे घड्याळ चर्चेत? ट्रोलिंग होताच दिलं सडेतोड उत्तर
सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘सुनेत्रा काकींसोबत वागताना संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, हे लक्षात ठेवा. ‘जय’ला कुठे जागा द्यायची हे नेते ठरवतात. काकींच्या खांद्यावर हात ठेवणं योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवार या सक्षम महिला आहेत. त्या स्वतः पत्रकार परिषदेला सामोरं जाऊ शकतात. अजित पवार यांना कंट्रोल करता आलं नाही, पण सुनेत्रा पवारांना कंट्रोल करता येईल, असा कुणाचा समज असेल, तर तो गैरसमज आहे. तेच ते चार शब्द एका महिला आमदाराने बोलून दाखवले आणि ते समोर आलं. एक पुतण्या म्हणून मी विनंती करतो की, काकींनीही स्वतःला सांभाळून घ्यावं, असं रोहित पवार म्हणाले.
हेदेखील वाचा : Rohit Pawar PC : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय






