फोटो सौजन्य - pinterest
सध्या वेगाने विस्तार होत असलेलं नेटवर्क म्हणजे BSNL. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Airtel, Jio आणि Vodafone-Idea म्हणजेच Vi ने त्यांच्या तारीफ प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर BSNL च्या युजर्स मध्ये प्रचंड वाढ झाली. ग्राहकांची वाढती संख्या पाहता BSNL ने देखिल त्यांच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार BSNL ने आता TATA सोबत 1000 गावांमध्ये 4G नेटवर्क सुरू करण्यासाठी करार केला आहे. या नेटवर्कची चाचणी देखील सुरू झाली आहे. आता लवकरच 1000 गावांमध्ये BSNL चा 4G नेटवर्क सुरू केलं जाणारं आहे. BSNL ची वाढती ग्राहक संख्या Airtel, Jio आणि Vi साठी डोकेदुखी ठरणार आहे.
हेदेखील वाचा- 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola g04s लाँच! किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी
Jio, Airtel आणि Vi ने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर देशभरातील लाखो ग्राहकांनी BSNL सिम वापरण्यास सुरुवात केली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी BSNL नेही तयारी केली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात 4G सेवा पुरवण्यासोबतच BSNL ने 5G सेवेची तयारीही सुरू केली आहे. BSNL नेटवर्क सुधारण्यात व्यस्थ असतानाचा भारताचे विद्यमान दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BSNL बाबत एक महत्वाचा निर्णय घेतला होता.
हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू
भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं की, BSNL द्वारे स्वदेशी 4G उपकरणे वापरण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींचा होता. BSNL या 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी भारतात बनवलेल्या उपकरणांचा वापर व्हावा, अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती. या निर्णयानुसार, BSNL स्वदेशी विकसित उपकरणे वापरून देशभरात 4G नेटवर्कचा विस्तार करणार आहे. यामुळे दळणवळण व्यवस्था अधिक चांगली आणि सुरक्षित होईल. भारतातील दळणवळण बळकट करण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.स्वदेशी उपकरणे वापरल्याने BSNL ची सेवा सुधारण्यास मदत होईल आणि ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा मिळेल.
BSNL ला लोकांची पंसती मिळत असताना TATA Consultancy Service ने BSNL सोबत एक करार केला होता. या कराराअंतर्गत 1000 खेड्यांमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. TATA आणि BSNL यांच्यामध्ये सुमारे 15 हजार कोटींचा करार झाला होता. महिनाभरापूर्वी झालेल्या या करारानंतर आता गावांमध्ये इंटरनेट चाचणी सुरु करण्यात आली आहे. BSNL ला मिळणारी लोकांची पसंती आणि TATA आणि BSNL यांच्यामधील करारानंतर आता होत असलेली इंटरनेट चाचणी यामुळे JIO आणि Airtel ची डोकेदुखी वाढणार आहे.
BSNL ने TATA सोबत करार करत देशातील 1000 खेड्यापाड्यामध्ये 4G नेटवर्क सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता BSNL ला मेड इन इंडिया उपकरणांच्या मदतीने भारतात 4G नेटवर्क सुरू करण्यासाठी किती वेळ लागणार आणि भारतीय दूरसंचार बाजारात BSNL चं 5G नेटवर्क कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.