Lava करणार मोठा धमाका! 24 जुलैला लाँच होणार दोन नवे स्मार्टफोन्स; स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा
कंपनीच्या आगामी लावा विराट व्हि 1 5G स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले दिला जाणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन IP64-रेटिंगला सपोर्ट करणार आहे. कंपनीने खात्री केली आहे की, आगामी स्मार्टफोन युनिसोक T8200 चिपसेट आणि 4 जीबी रॅमने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह 4GB वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील दिला जाणार आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील मिळणार आहे. हा आगामी 5जी फोन 6,000mAh बॅटरीने सुसज्ज असणार आहे. तसेच कंपनीचं म्हणणं आहे की, या फोनमध्ये यूजर्सना क्लीन अँड्रॉईड एक्सपीरियंस ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच फोनमध्ये ॲड किंवा ब्लॉटवेयर प्री-इंस्टॉल असणार नाहीत. हा फोन आर्या ब्लू आणि सोनार गोल्ड या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.
कंपनीच्या दुसऱ्या आगामी स्मार्टफोन लावा विराट व्हि 1 मध्ये 6.75-इंच एचडी+ डिस्प्ले दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली जाणार आहे. लावाचा हा फोन युनिसॉक SC9863A प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये 4GB रॅम, 4GB पर्यंत वर्चुअल रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे.
लावाच्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा एआय डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. हा 4G फोन, विराट व्हि 1 स्मार्टफोन जाहिराती किंवा ब्लोटवेअरशिवाय एक स्वच्छ अँड्रॉईड अनुभव ऑफर करणार आहे. ग्राहक हा आगामी स्मार्टफोन नीलगिरी ब्लू आणि हिमालयन सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.
टेक कंपनीने घोषणा केली आहे की, दोन्ही स्मार्टफोन्स 24 जुलै रोजी लाँच केले जाणार आहेत. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, कंपनी दोन्ही स्मार्टफोन्सवर मोफत घरपोच सेवा देईल. कंपनीने अद्याप किमतीचा तपशील जाहीर केलेला नाही.






