8 हजारांहून कमी किंमतीत मिळणार iPhone 16 सारखे डिझाईन, 24 जूनला लाँच होणार हा स्मार्टफोन! वाचा स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन कंपनी Tecno ने अलिकडेच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच केला होता. हा स्मार्टफोन Tecno Spark Go 1 या नावाने लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोनमध्ये Unisoc T615 चिप देण्यात आली होती. या स्मार्टफोननंतर आता कंपनीचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोन Tecno Spark Go 1 चा सक्सेसर असणार आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, नवीन स्मार्टफोन Tecno Spark Go 2 या नावाने लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. आगामी स्मार्टफोन 24 जून रोजी लाँच केला जाणार आहे. कंपनीने कन्फर्म केलं आहे की, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे अपकमिंग स्मार्टफोनबाबत काही माहिती मिळाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tecno Spark Go 2 स्मार्टफोन भारतात चार कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये ब्लॅक, व्हाइट, लाइट ब्लू आणि लाइट गोल्ड यांचा सामावेश असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये फ्रंटला पंच होल डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची डिझाईन iPhone 16 प्रमाणे दिसत आहे.
Tecno Spark Go 2 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी बांग्लादेशात लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनमध्ये कोणतेही बदल केला जाणार नाही. म्हणजेच हा स्मार्टफोन त्या स्पेसिफिकेशनसह लाँच केलं जाणार आहे ज्यांचा बंगलादेशात समावेश होता. या फोनमध्ये 6.67-इंच LCD पॅन आणि HD+ रेजोल्यूशनसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
या फोनमध्ये रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये 1300 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. Tecno Spark Go 2 स्मार्टफोनमध्ये Unisoc T615 चिपसेट देण्यात आला असून या फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेज देखील आहे. टेक्नो च्या Spark Go 2 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये आईआर ब्लास्टर आणि साइड माउंटेड फिगंर प्रिंट सेंसर देखील असणार आहे.
Tecno Spark Go 2 स्मार्टफोन 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल, असं सांगितलं जात आहे. यापूर्वी, Spark Go 1 भारतात 7,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.