BSNL ने उडवली टेलिकॉम कंपन्यांची झोप! सुरु केली अनोखी सर्विस, SIM कार्डशिवाय वापरता येणार 5G इंटरनेट सर्विस
देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कंपनीने देशातील आघाडीच्या आणि खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. कारण कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक अनोखी सर्विस सुरु केली आहे. ही एक अशी सर्विस आहे, ज्याची युजर्स गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. कंपनीने सांगितलं आहे की, आता युजर्स सिम कार्डशिवाय 5G इंटरनेट सर्विसचा वापर करू शकणार आहेत.
तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत
BSNLने हैदराबादमध्ये अधिकृतपणे त्यांची नवीन Quantum 5G सेवा सुरु केली आहे. या सर्विसला Q-5G असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीने ही सर्विस सुरु करून देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठं आव्हान दिलं आहे. ही सेवा लवकरच बंगळुरु, पुणे, विशाखापत्तनम, चंडीगड आणि ग्वालियर यासांरख्या शहरात देखील सुरु केली जाणार आहे. ही सेवा युजर्ससाठी अत्यंत खास असणार आहे, कारण यामध्ये युजर्सना सिम कार्डशिवाय 5G इंटरनेट सर्विसचा वापर करता येणार आहे.
कंपनीने सुरु केलेल्या या नवीन सर्विसअंतर्गत युजर्स कोणत्याही सिम कार्ड आणि वायरिंगशिवाय हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करू शकणार आहेत. या सर्विसअंतर्गत कंपनीने दोन प्लॅन लाँच केले आहेत. ज्यांची किंमत 999 रुपये आणि 1,499 रुपये आहे. युजर्सना 999 रुपयांत 100Mbps आणि 1,499 रुपयांत 300Mbps स्पीडचा प्लॅन ऑफर केला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही फायबर लाईन किंवा कॉलिंग सुविधेची आवश्यकता नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL ची ही Quantum 5G सेवा विशेष करून भारताच्या टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी सुरु करण्यात आली आहे. जिथे आजही ऑप्टिकल फायबरची पोहोच खूपच मर्यादित आहे. ही सेवा सुरु करण्यामागील उद्देश म्हणजे छोटे व्यवयास आणि ऑफीस इंटरनेटने जोडणे. Q-5G तंत्रज्ञान पूर्णपणे भारतात विसकित करण्यात आलं आहे. यासाठी वापरण्यात आलेले डिव्हाईस देखील स्वदेशी आहेत. ही सेवा फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) तंत्रज्ञानाद्वारे प्रदान केली जाईल, ज्यामुळे यूजर्सना कोणत्याही वायर किंवा लँडलाइनशिवाय इंटरनेटची सुविधा मिळेल.
BSNL च्या या नवीन सर्विसमध्ये युजर्स केवळ इंटरनेट डेटाचा वापर करू शकणार आहेत, कॉलिंगचा नाही. ही सर्विस Airtel Xstream Fiber आणि Jio AirFiber प्रमाणेच आहे. मात्र याचे वैशिष्ट्य असं आहे की, याचा वापर करण्यासाठी युजर्सना सिम कार्डची गरज भासणार नाही. यासाठी, तुमच्या घराच्या छतावर कस्टमर प्रिमाइसेस इक्विपमेंट (CPE) बसवले जाईल जे जवळच्या BSNL 5G टॉवरमधून सिग्नल पकडेल आणि तुमच्या घरातील राउटरवर ट्रान्सफर करेल.