50MP सेल्फी कॅमेरा आणि 5500 mAh बॅटरीसह Motorola Edge 60 लाँच, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने भारतात त्यांचे नवीन बजेट डिव्हाईस लाँच केले आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने Motorola Edge 60 या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मोटोरोला एज 60 प्रो आणि एज 60 फ्यूजननंतर लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन डिव्हाईसमध्ये ऑन-डिवाइस AI टूल्स देखील देण्यात आले आहेत. या डिव्हाईसची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे.
ChatGPT Global Outage: OpenAI चा चॅटबॉट झाला डाऊन, एक्सवर तक्रारींचा पाऊस! युजर्स वैतागले
Motorola Edge 60 च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोलाच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 6.7 इंचाचा क्वाड कर्व्ड pOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
♦Android 15 (3 OS + 4 Years of Security Updates)
♦MIL-810H Military Grade
♦IP68/69 rating
♦Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB 2.0
♦8.2mm
♦181gPrice:
12GB+256GB: ₹25,999(2/2)#Motorola #MotorolaEdge60 pic.twitter.com/WAQqCdGVYW
— Tushar Gupta (@TusharG98540565) June 10, 2025
याशिवाय या नवीन स्मार्टफोनमध्ये 4nm MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर देखील दिला आहे, ज्याला 12GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजसह आणलं आहे.
यासोबतच या डिव्हाईसमध्ये 5,500 mAh ची दमदार बॅटरी आणि 68W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन मोटोरोलाच्या Hello UI सह Android 15 वर चालतो. डिव्हाईसमध्ये तुम्हाला इमेज स्टूडियो, MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी, गोरिल्ला ग्लास 7i, IP68/IP69 रेटिंग आणि डॉल्बी एटमॉसचा सपोर्ट आणि अनेक मोटो AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 50MP चा प्रायमरी OIS सह Sony LYTIA 700C लेंस, 50MP अल्ट्रा वाइड/मॅक्रो आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10MP टेलीफोटो कॅमेरा ऑफर केला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी डिव्हाइसमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हॅपी बर्थडे Sundar Pichai! छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर ते Google चे सीईओ, असा होता त्यांचा प्रवास
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोला एज 60 एकच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज याचा समावेश आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,999 रुपये आहे. बँक ऑफर्ससह हा फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये होणार आहे.