हॅपी बर्थडे Sundar Pichai! छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर ते Google चे सीईओ, असा होता त्यांचा प्रवास
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई तरूणांचा आदर्श आहेत. आज 10 जून रोजी सुंदर पिचाई यांचा वाढदिवस आहे. सुंदर पिचाई आज त्यांचा 53 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आयटी सेक्टरमध्ये काम करणारा एक साधा तरूण ते गुगलचा सिईओ, असा प्रवास सुंदर पिचाई यांनी पूर्ण केला आहे. खरंतर, सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेसमॅन आहेत. आज जगभरातील अनेक असे तरूण आहेत, जे सुंदर पिचाई यांना आपला आदर्श मानतात.
तमिळनाडुच्या मुदैरमध्ये 10 जून 1972 रोजी सुंदर पिचाई यांचा जन्म झाला होता. सुंदर पिचाई यांचे बालपण आणि शिक्षण तमिळनाडूमध्ये पूर्ण झाले आहे. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मी होतं, त्या एक स्टेनोग्राफर होत्या. तर सुंदर यांच्या वडीलांचं नाव रघुनाथ पिचाई होतं, ते इलेक्ट्रिकल इंजीनियर होते. सुंदर मेटलर्जिकल इंजीनियरिंगचे विद्यार्थी होते. या काळात त्यांना त्यांच्या बॅचमध्ये सिल्वर मेडल मिळाले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
आईआईटीनंतर त्यांनी स्कॉलरशिपच्या मदतीने अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून मॅटीरियल साइंसमध्ये एमबीए केले. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली. सुंदर पिचाई यांना क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याचीही आवड आहे. सुंदर सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे खूप मोठे फॅन आहेत. सुंदर पिचाई यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुंदर पिचाई यांचे घर अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस अल्टोस येथील सांता क्लारा येथील एका टेकडीवर आहे.
अमेरिकेत जाण्यापूर्वी सुंदर पिचाई यांच्याकडे साधा कंप्यूटर देखील नव्हता. खरं तर सुंदर पिचाई यांना अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्याची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली. सुंदर यांनी एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून पहिली नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या कंपनीत कंसल्टेंट म्हणून देखील नोकरी केली होती.
2004 मध्ये सुंदर पिचाई यांना गुगलकडून ऑफर मिळाली आणि त्यांनी टेक जायंट कंपनी गुगल जॉईन केली. त्यांना पहिला प्रोजेक्ट प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि इनोवेशन विभागात देण्यात आला. येथे सुंदर पिचाई यांना गुगलचे सर्च टूल सुधारण्याचे आणि इतर ब्राउझरच्या युजर्सना गुगलवर आणण्याचे काम देण्यात आले. यावेळी त्यांनी कंपनीला गुगलने स्वतःचा ब्राउझर लाँच करावा असे सुचवले.
गूगलचे अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी आणि 2008 मध्ये लाँच करण्यात आलेल्या क्रोमला युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भुमिका होती. कामामुळे आणि नवीन कल्पनांमुळे गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांनी सुंदर पिचाई यांचे प्रचंड कौतुक केले. त्यांनी गुगलमध्ये प्रोडक्ट चीफ आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम चीफ अशी पदे भूषवली. 2015 मध्ये सुंदर पिचाई यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले.
सुंदर पिचाई यांच्या यशात त्यांची पत्नी अंजली पिचाई यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना सुंदर पिचाई यांची अंजलीशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनीही लग्न केले.