Maharashtra Breaking News Updates Today
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या कच्च्या तेलाच्या तुटवड्याचा थेट फटका भारताला बसत असून देशात महागाईचा भडका उडाला आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात इंधनाची टंचाई निर्माण झाली असून काही देशांमध्ये तर लॉकडाऊनची स्थिती आली आहे. गेल्या चार वर्षांपासून सरकारने इंधन दर नियंत्रणात ठेवले होते, मात्र आता आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाच दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. हा धक्का ओसरतो न ओसरतो तोच, अवघ्या पाच दिवसांत पुन्हा एकदा देशभरात पेट्रोल ८६ पैशांनी तर डिझेल ८३ पैशांनी महागले असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
19 May 2026 06:10 PM (IST)
भारत आता पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. सरकारने सध्याच्या E20 योजनेच्या पुढे जाऊन E22, E25, E27 आणि E30 इंधनांसाठी तांत्रिक तयारी सुरू केली आहे. याचा अर्थ असा की, भविष्यात पेट्रोलमध्ये २२%, २५%, २७% आणि अगदी ३०% इथेनॉल मिसळले जाऊ शकते.
19 May 2026 06:02 PM (IST)
Ashok Kharat Case Update: नाशिकमधील भोंदू अशोक खरातविरुद्ध सुरू असलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. अटक होण्यापूर्वी खरातने संशयास्पद आणि बेनामी खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधीचे व्यवहार केले आणि सुमारे ५२ कोटी रुपये काढून परदेशात पळून जाण्याची त्याची योजना होती, अशी माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. खरातने काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि प्राप्तिकर चुकवण्यासाठी बँकिंग नियमांच्या मयदितील त्रुटींचा गैरफायदा घेतला.
19 May 2026 06:00 PM (IST)
Mhaswad Police : माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट झाले होते. “साहेब यांना जरा चाप लावाच” अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची होती. त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी कारवाईचा बडगा उगरल्याने म्हसवडच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काही दुचाकी स्वार बेभान होऊन गाडी चालवत असत. शहरातील चांदणी चौक,महात्मा फुले चौक,स्टॅन्ड परिसर व शिंगणापूर चौक याठिकाणी गाड्या वाहतूकीच्या नियमांचे पालन न करता चालवल्याने काही जणांचा अपघात झाला आहे. त्यांच्यावर काही कारवाई होतं नसल्याने दुचाकीच्या वेगावर नियंत्रण राहिले नव्हते. ज्यामुळे येथे अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
19 May 2026 05:50 PM (IST)
बहुचर्चित मराठी चित्रपट Tighee थिएटरमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. यानिमित्त अभिनेत्री Neha Pendse हिने चित्रपटाच्या प्रवासाबद्दल आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल खास भावना व्यक्त केल्या आहेत. नेहा म्हणाली, “तिघी हा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर आकार घेत गेला. त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रवासाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास होतं. चित्रपटाची संकल्पना, व्यक्तिरेखा आणि त्यामागची भावनिक प्रामाणिकता मला सुरुवातीपासूनच भावली होती. प्रत्येक दिवसागणिक आम्हाला जाणवत होतं की आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत.”
19 May 2026 05:40 PM (IST)
Vandana Shah Fee: बॉलिवूडमधील Actor, Actress आणि नामांकित उद्योगपतींच्या घटस्फोटाची प्रकरणे हाताळणाऱ्या, प्रसिद्ध वकील वंदना शाह सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांच्याविषयीच्या या चर्चांचे कारण एखादे विशिष्ट प्रकरण नसून, त्यांची प्रचंड फी हे आहे. त्यांनी नुकतेच उघड केले की, केवळ ४५ मिनिटांच्या कन्सल्टेशनसाठी बरीच मोठी रक्कम आकारतात. काय आहे ती रक्कम ? आणि नेमका कसा आहे प्रवास जाणून घेऊयात.
19 May 2026 05:30 PM (IST)
BCCI/IND Vs AFG: बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ आयपीएल संपताच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका खेळणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.
वन-डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. केएल राहुल कसोटी संघाचा आणि श्रेयस अय्यर वनडे संघाचा उपकर्णधार असणार आहे. वनडे संघात इशान किशन परतला आहे. तर अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्माचा देखील समावेश करण्यात आला आहे.
19 May 2026 05:20 PM (IST)
महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ‘महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 – The Progressive Maharashtra’ चा चौथ्या आवृत्तीचे मंगळवार, 19 मे 2026 रोजी ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. “Magnetic Maharashtra – Where Growth Attracts the World” या संकल्पनेवर आधारित हा कॉन्क्लेव राज्याच्या वाढत्या औद्योगिक, पायाभूत आणि गुंतवणूक क्षमतेचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करणार आहे. या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे.
19 May 2026 05:10 PM (IST)
PM Modi Norway Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान जोनास जोनास गहर स्टोर आणि नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही उच्चस्तरीय बैठकीत अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, मत्स्यव्यवसाय, सागरी सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान, हरित उर्जा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले आहे. दरम्यान या दौऱ्यात एक वादग्रस्त प्रसंग घडला आहे. पंतप्रधान मोदींना जेव्हा नॉर्वेजियन महिला पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांना दुर्लक्ष करत उत्तर न देता तिथून निघून गेले. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर तीव्र टीका केला जात आहे.
19 May 2026 05:03 PM (IST)
जगभरात Cannes Film Festival 2026 सोहळ्यासाठी भन्नाट क्रेझ पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी अभिजात मराठीची टीम उपस्थित राहिली आहे. दरम्यान, या सगळ्या कलाकारांनी आपल्या अफलातून पारंपरिक Costume मधून मराठी मातीचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या चाहत्यांची एक वेगळीच हवा आहे. प्राजक्ताचा Look पाहून तिच्या चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे.
19 May 2026 04:50 PM (IST)
सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये इंधन तुटवडा पडल्याचे पाहायला मिळत आहे.अहिल्या नगरच्या सुपा एमआयडीसी या ठिकाणी देखील इंधन तुटवडा निर्माण झाल्याने पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील अनेक उद्योगांना फटका बसत असल्याचे समोर आलं आहे... एमआयडीसीतील अनेक कारखाने हे विजेवर चालतात परंतु वीज खंडित झाल्यानंतर जनरेटर च्या साह्याने हे कारखाने चालवले जातात परंतु इंधन तुटवल्यामुळे जनरेटर बंद पडत आहे...यामुळे कारखान्यातील उत्पादन देखील बंद पडत असल्याने कारखानदार चिंतेत आले असून.सुपा एमआयडीसी मध्ये दोन दिवसापासून इंधनपुरवठा विस्कळीत झाला आहे...त्यामुळे मालवाहतूक होत असलेली यंत्रणा देखील विस्कळीत झाली आहे. सुपा एमआयडीसीतील अनेक कारखान्यांना जनरेटर साठी डीझेल लागते तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी देखील डिझेलची आवश्यकता असते.प्रशासनाने एमआयडीसीसाठी इंधनपुरवठ्याची वेगळी व्यवस्था करावी अशी मागणी आता उद्योजकांकडून होत आहे.
19 May 2026 04:45 PM (IST)
कल्याण पूर्व येथील अडवली ढोकरी परिसरात नाल्यांची सफाई न झाल्याने पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागते . नागरिकांच्या मोठा प्रमाणात नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी परिसरात शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासोबत पाहणी दौरा केला. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान कुणाल पाटील यांनी शहरा अभियंता अनिता परदेशी यांना पुष्पगुच्छ देत आता तरी आमची नाल्यांची समस्या सोडवा आणि नव्याने नाले तयार करा अशी विनंती केली .एवढेच नाही तर समस्या सुटली नाही तर केडीएमसी आयुक्त दालनात नागरिकांसोबत जाऊन बसणार व तीव्र आंदोलन करणार अशा इशारा देखील कुणाल पाटील यांनी दिला आहे. यावर केडीएमसीच्या मुख्य अभियंता अनिता परदेशी यांनी आश्वासन दिले की डीपीआर तयार केला आहे लवकरच काम सुरू होईल.
19 May 2026 04:40 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ पिकाचे लहरी हवामानामुळे मोठे नुकसान झाले आहे. यंदा जांभूळ पीक चांगले असताना ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे फळाची मोठी गळती होत आहे. यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई, नवी मुंबई बाजारपेठेत जांभूळच्या किमतीत घसरण झाली आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे.
19 May 2026 04:35 PM (IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवडाभरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. त्यानुसार रत्नागिरीत पेट्रोलच्या दर 109.53 रुपये आणि डिझेल 96.6 रुपयांवर पोहचले आहे आज सकाळपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.
19 May 2026 04:30 PM (IST)
एएम. एनएस. इंडिया या खालापूर तालुक्यातील खिरकिंडी येथे असणाऱ्या कंपनीत कामगाराचा काम करीत असताना हृदय विकाराच्या झटाक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर कामगारास उपचार वेळेवर न मिळाल्याने काही काळ कंपनी परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ खालापूर पोलीसांनी कंपनीत धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
19 May 2026 04:25 PM (IST)
पावसाळा तोंडावर आलेला असताना वेंगुर्ला तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अद्यापही सुरळीत नसल्याचा आरोप करत भाजपा-शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी वेंगुर्ला कॅम्प येथील महावितरण कार्यालयाला धडक दिली. मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी शिष्टमंडळासह कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयात अत्यल्प कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नितेश राणे यांनी आठ दिवसांपूर्वीच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रत्यक्षात कामांना गती नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. भेटीदरम्यान कार्यालयात केवळ बिलिंग स्टाफ, एक कनिष्ठ अभियंता आणि अन्य एक कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. उपअभियंता पेटकर हे कार्यालयात अनुपस्थित होते.
19 May 2026 04:20 PM (IST)
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरात अनधिकृतपणे उभ्या करून ठेवलेल्या मोडकळीस आलेल्या व जुन्या नौकांवर अखेर मत्स्य विभागाने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. या नौका हटविण्यासाठी संबंधित मालकांना प्रशासनाकडून यापूर्वी अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात या नौका हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून काही मोडक्या व वापरात नसलेल्या नौका अनधिकृतपणे उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बंदरातील वाहतूक, मासेमारी व्यवसाय तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत होत्या. या नौकांमुळे मच्छीमारांना बोटी लावण्यासाठी जागेची कमतरता भासत होती. तसेच बंदर परिसराचे सौंदर्यही बाधित होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने संबंधित नौका मालकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा पाठवल्या होत्या. तरीही मालकांनी दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत आज सकाळपासून पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोडक्या नौका हटविण्याचे काम करण्यात आले.
19 May 2026 04:15 PM (IST)
कर्जत मध्ये येऊ घातलेले टोरंट जलविद्युत,पोशीर आणि शिलार या धरणांच्या विरोधात येथील पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतकर रस्त्यावर उतरले होते.या एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी कर्जत तालुका रस्त्यावर उतरलेला दिसून आला,किमान 2000 कर्जतकर यांनी सह्या करून विरोध दर्शवला.टोरंट वीज प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरण यामुळे होणारे पर्यावरण नुकसान आणि कर्जतचे हरितपण अबाधित ठेवण्यासाठी कर्जत बचाव समिती कार्य करीत आहे.या समितीच्या माध्यमातून आज कर्जत येथे लोकमान्य टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.टोरेंट' प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा विनाश होणार आहे.टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित ९३२ एकर प्रकल्पावर आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतला. यातील ६०० एकर जागा ही थेट घनदाट वनविभागाची आहे. पश्चिम घाटातील हा अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून, येथे लाखो झाडे तोडली जाणार आहेत, ज्यामुळे येथील वन्यजीव आणि वनस्पती धोक्यात येतील. भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याला गेल्या २० वर्षांपासून वनविभागाकडून मंजुरी मिळत नव्हती, मग खाजगी टोरेंट कंपनीसाठी वनविभागाने तातडीने 'रेड कार्पेट' कसे अंथरले? असा थेट सवाल आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. तसेच हायटेन्शन वीज वाहिन्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असून भविष्यात त्यांच्या जमिनींचे मूल्य कमालीचे घटणार आहे.
19 May 2026 04:15 PM (IST)
मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी वाढीव ग्रॅज्युइटी आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी आज महानगरपालिकेबाहेर आंदोलन करत होते. यावेळी घडलेल्या धक्कादायक अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर परिवहन विभागाची ठाण्याकडे जाणारी बस (क्रमांक MH04LY6990) आंदोलनस्थळाजवळून जात असताना ४२ वर्षीय महिला सफाई कर्मचाऱ्याच्या पायावरून गेली. या अपघातात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले जात आहे.
19 May 2026 04:10 PM (IST)
रत्नागिरीतील भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढत असताना आलेल्या मोठ्या लाटेसोबत भाटकरवाडा येथील महिला समुद्रात कोसळली. अचानक समुद्रात वाहून जाणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला मिलके कुटुंबाच्या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या अफाट धाडसामुळे जीवदान मिळाले आहे. सबीला भाटकर (वय ३५, रा. भाटकरवाडा) असे प्राण वाचवण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सबीला भाटकर या भगवतीनगर येथील समुद्रात कालवं काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र,अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या धक्क्याने त्या समुद्रात कोसळल्या. समुद्राच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्या अचानक खोल पाण्यात वाहून जाऊ लागल्या. या गंभीर प्रसंगी त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
19 May 2026 03:55 PM (IST)
Tata IPL 2026 RR Vs LSG Live Updates: आयपीएल 2026 मध्ये साखळी सामने संपत आले तरी प्ले ऑफमध्ये जाणारे 4 संघ निश्चित झाले नाहीत. आज सर्वात महत्वाचा सामना जयपूरमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण (IPL 2026) आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. जयपूरच्या या मैदानावार कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे. वाचा सविस्तर
19 May 2026 03:50 PM (IST)
अमेरिकेसोबत तणाव वाढत असताना इराणमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणच्या तरुण मुलींना AK-47 चे प्रशिक्षण असॉल्ट रायफल्स जोडण्याचे आणि त्या डिसेंबल करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
In Tehran, Iranian women are being taught how to field strip and assemble AKs.
Remember when the mainstream media told you they desperately wanted to overthrow their government? pic.twitter.com/Ga8njNtBFT
— Wyatt Reed (@wyattreed13) May 17, 2026
19 May 2026 03:45 PM (IST)
होर्मुझमध्ये मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिका इराण तणावामुळे १,५०० व्यापारी जहाजे समुद्रात अडकली आहेत. या जहाजांवर २०,००० हून अधिक नाविक उपस्थित आहेत. तज्ज्ञांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या धोक्याचा इशारा दिला आहे.
19 May 2026 03:40 PM (IST)
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचे संशयातून एका 41 वर्षीय व्यक्तीचा भर रस्त्यात धारदार शस्त्रने हल्ला करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वाचा सविस्तर
19 May 2026 03:35 PM (IST)
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गाझासाठी मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला इस्रायलने अडवले आहे. यासाठी इस्रायल नौदलाचा एक मोठा ताफा रवाना करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली दलांनी समुद्रात अनेक जहाजे आणि शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
Organizers of the Gaza aid flotilla said Israeli forces had intercepted 10 of their boats and that contact had been lost with a total 23 vessels in the eastern Mediterranean https://t.co/9tY1kWG9cq pic.twitter.com/a3I8qSqs1c
— Reuters (@Reuters) May 18, 2026
19 May 2026 03:30 PM (IST)
Satara Nagarpalika News: सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडलेल्या वादग्रस्त प्रकारानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार गटाच्या नगरसेवकांची तातडीची बैठक घेऊन संबंधितांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सभागृहात झालेली वैयक्तिक स्वरूपाची शेरेबाजी ही अत्यंत निंदनीय असून, पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी असल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर
19 May 2026 03:25 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांची भेट घेतली. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी अमेरिका इराण संघर्षावर आणि युक्रेन युद्धावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही समस्येचे निराकरण केवळ लष्कीर संघर्षातून होत नाही. यासाठी शत्रूत्व संपुष्टात आणून राजनैतिक स्तरावर शांतता चर्चा करावी असा संदेश त्यांनी दिला.
19 May 2026 03:20 PM (IST)
पंतप्रधान मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर असून येथे तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले आहे. या परिषदेत नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि आइसलँड या पाच देशांचा सहभाग असून हरित ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण. हवामान बदल, व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा पार पडत आहे. या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी इटलीला भेट देतील. तेथे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा नियोजित करण्यात आली आहे.
19 May 2026 03:15 PM (IST)
पंतप्रधान मोदी सध्या ५ देशांच्या युरोप दौऱ्याचा एक भाग म्हणून नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते भारत-नॉर्डिर शिखर परिषदेत सहभागी झाले असून यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि आइसलँड या देशांचा सहभाग आहे. यावेळी त्यांनी आईलँडच्या पंतप्रधान क्रिस्टन मझोल फ्रॉस्टडोटीर यांची भेट घेतली असून द्विपक्षीय चर्चा केली आहे.
#WATCH ओस्लो, नॉर्वे: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आइसलैंड की प्रधानमंत्री क्रिस्ट्रुन एमजोल फ्रॉस्टाडॉटिर के साथ द्विपक्षीय बैठक की।
(सोर्स: ANI/DD) pic.twitter.com/NxQThct8xd
— ANI_HindiNews (@AHindinews) May 19, 2026
19 May 2026 03:10 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात नॉर्वेत आहेत. हा टप्पा यशस्वी झाला असून पंतप्रधान मोदी भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या दरम्यान त्यांनी नॉर्वेची राजधानी ओस्लोम येथे फिनलँडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली आहे.
#WATCH ओस्लो, नॉर्वे: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने फिनलैंड के प्रधानमंत्री पेटेरी ओर्पो के साथ द्विपक्षीय बैठक की।
(सोर्स: ANI/DD) pic.twitter.com/DK6paJzUVU
— ANI_HindiNews (@AHindinews) May 19, 2026
19 May 2026 03:05 PM (IST)
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून आणि इंधन टंचाईमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “सध्या लोकांकडे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. महागाईमुळे त्रास सहन करावा किंवा जय श्रीराम म्हणत शांत बसा,” अश्या शब्दांत त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
19 May 2026 03:00 PM (IST)
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने सर्वांनाच चकित केलं. लग्न पार पडलं पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने स्वत:ला संपवून टाकलं. या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका रात्रीतच वराने इतके टोकाचे पाऊल का उचलले आणि यामागे कुणाचा हात आहे याचा तपास केला जात आहे. सांगण्यात येत आहे की, नवऱ्याने होडन रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर आता अनेकांवर या मृत्यूचे आरोप लावण्यात आले असून मृताच्या भावाने लग्नाच्या रात्री नवरदेवाचे त्याच्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाल्याचे स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर
19 May 2026 02:59 PM (IST)
पालघर -धानिवरी इथल्या अपघातातील मयतांच्या मृतदेहांवर आज बापूगाव इथं एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे. 12 मृतदेहांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी मयताच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे अंत्यसंस्काराला उपस्थितीत राहणार आहेत. सरकारने अपघातातील मयतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात अनेक कुटुंबाचे प्रमुख गेल्याने सरकारकडून दहा लाखांवर मदत करावी, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.
19 May 2026 02:51 PM (IST)
लातूरमधील प्रसिद्ध 'रेणुकाई करिअर सेंटर' संचालक शिवराज मोटेगावकर याला पेपरफुटी प्रकरणी CBIने अटक केली. नीट पेपरफुटी देशभरात संतपाची लाट आहे, आज अकोल्यात मोटेगावकर याच्या क्लाससमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत RCC बॅनरवर शेण फेकत निषेध व्यक्त केला. अकोला शहरातील RCC मोटेगावकर कोचिंग क्लाससमोर काल मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत क्लासच्या बोर्डाला काळे फासले होते.
19 May 2026 02:40 PM (IST)
बनावट जीएसटी बिले तयार करून सुमारे 40 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई जीएसटी विभागाकडून अमित उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. अमित उपाध्याय हा 8 पेक्षा अधिक कंपन्यांचा संचालक असून, बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यवहारांच्या आधारे सुमारे 40 कोटी रुपयांचा जीएसटी रिटर्न मिळवल्याचा आरोप आहे.
19 May 2026 02:29 PM (IST)
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरातून एक मोठी घटना समोर आली आहे. इथल्या एका मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन अल्पवयीन संशयित हल्लेखोरांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासानंतर स्थानिक पोलिसांनी हा 'हेट क्राईम' असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
19 May 2026 02:20 PM (IST)
नमाज पठण करायचे असेल, तर तुम्ही त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नमाज अदा करा. प्रेमाने सांगून तर ऐकलं नाही, तर मग दुसरा मार्ग अवलंबा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला.
19 May 2026 02:12 PM (IST)
हिंगोलीत इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी धोरणांविरोधात उग्र आंदोलन करत थेट पुतळा जाळला आहे. पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
19 May 2026 02:00 PM (IST)
Nawazuddin siddiqui यांनी गेल्या अनेक वर्षांत आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी आणि ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. विविध प्रकारच्या भूमिका सहज साकारण्याची त्यांची क्षमता, प्रभावी पडद्यावरील उपस्थिती आणि प्रत्येक पात्रात पूर्णपणे समरस होण्याची कला यामुळे ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवत आले आहेत.
19 May 2026 01:55 PM (IST)
यूजीसी नेट परीक्षा भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफसर किंवा ज्युनियर रिसर्ज फेलोशिपसाठीची पात्रता निश्चित करते. यावेळी जून 2026 सत्रासाठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून 20 मे 2026 रोजी अंतिम तारिख आहे. त्यामुळे आज उमेद्वारांनी लवकरात लवकर अर्ज कसा करावा? हे आता आपण जाणून घेऊया.
19 May 2026 01:50 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज (१९ मे) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांनी राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रशांत किशोर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार आहेत.
19 May 2026 01:45 PM (IST)
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर ते दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. दरम्यान व्हिएतनाम दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजधानी हनोई येथे राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायाला संबंधोत केले. यावेळी त्यांनी शेजारी शत्रू देश पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. शेजारी देशांनी कोणत्याही नापाक हरकती केल्या तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल असे त्यांनी म्हटले.
19 May 2026 01:40 PM (IST)
कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिरानेच आपल्या वहिनीची डोके फोडून हत्या केल्याच्या समोर आल्या. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी केवळ 20 मिनिटांचा उशीर झाला असता, तर आरोपी नेपाळमधून फरार झाला असता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
19 May 2026 01:35 PM (IST)
गेल्या एका आठवड्यातच देशभरात महागाईचा भडका उडाला. देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढल्याचं दिसून आलं आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांचा हवाला देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहनही केलं आहे. आता, अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांना खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. नेमके काय दिलेत निर्देश आणि त्याचा आपल्यावर काय होणार परिणाम? समजून घेऊयात.
19 May 2026 01:25 PM (IST)
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अभिनेत्री Jacqueline Fernandez ने अधिकृतपणे हजेरी लावत ग्लॅमरचा जलवा दाखवला आहे. प्रतिष्ठित मिरॅकल्स गालामध्ये तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.पहिल्याच रेड कार्पेट लूकमध्ये जॅकलिनने स्टायलिश आणि आकर्षक अंदाजात एंट्री करत उपस्थित प्रेक्षक आणि फॅशन प्रेमींना प्रभावित केले. तिचा हा लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत असून, चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत.
19 May 2026 01:15 PM (IST)
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकणे पुरेसे ठरणार नाही. सलग दुसऱ्या खराब हंगामानंतर, माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी सीएसकेला कर्णधारपद बदलण्याचा आग्रह केला आहे, कारण ऋतुराज गायकवाड फलंदाजीतही अपयशी ठरला आहे. त्यांनी पुढील हंगामासाठी कर्णधारपदाची सूत्रे संजू सॅमसनकडे सोपवण्याचा सल्ला दिला आहे.
19 May 2026 01:02 PM (IST)
उधारीच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बिबवेवाडीत घडली. यामारहाणीत तक्रारदाराच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी एजाज मोद्दीन जमदार (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. यावरून बाळू गोरे, बबन गोरे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबवेवाडीतील जगतताप डेअरीमागे घडली. आरोपींकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी तक्रारदाराशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन आरोपींनी त्यांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तक्रारदारांचा उजवा डोळा लाल झाला असून मानेलाही मार लागला आहे.
19 May 2026 12:46 PM (IST)
पर्वती पायथा परिसरात हातात लोखंडी हत्यार घेऊन "आम्ही जनताचे भाई आहोत" असे ओरडत दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमित बाळासाहेब चिव्हे यांनी तक्रार दिली आहे. यावरून धीरज उर्फ गुड्डू निलेश कदम (वय १९) व सक्षम सचिन कांबळे (वय १९) यांच्यावर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १६ मे रोजी रात्री साडे आठच्या सुमारास पर्वती पायथा येथील कालवा रोडवर ही घटना घडली. पोलिस उपायुक्त विशेष शाखा यांच्या आदेशानुसार पुण्यात शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही, आरोपींनी लोखंडी हत्यार विनापरवाना जवळ बाळगून जोरात आरडाओरडा सुरू केला. "आमच्या नादी लागाल तर तुकडे करीन" अशा धमक्या देत त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले आहे.
19 May 2026 12:46 PM (IST)
लातूर शहरातील छत्रपती चौकाच्या पुढे सोमवारी पहाटे धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३५ प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. अग्निशमन विभागाला पहाटे ३.०२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. मनोज रंदाले यांनी याबाबत माहिती दिली. नागपूर ते कोल्हापूर मार्गावर धावणारी खुराणा ट्रॅव्हल्सची एमएच ३८ एक्स ८०५३ क्रमांकाची बस लातूर शहराबाहेर छत्रपती चौकाच्या पुढे आली असता अचानक बसच्या टायरचा स्फोट झाला. त्यानंतर इंजिनमधून धुराचे मोठे लोट येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक नूरूला खान यांनी तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. वाहन चालकाच्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
19 May 2026 12:34 PM (IST)
नीट २०२६ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात अटक झालेल्या पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील शिक्षिका मनीषा मांढरेला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ३३ (५) अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, त्यांना अटक झालेल्या १६ मेपासून निलंबन लागू करण्यात आले आहे.
19 May 2026 12:22 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज ते नवले ब्रिजदरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.






