काय सांगता... हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स
स्मार्ट ग्लासेससोबत कंपनीने एक न्यूरल रिस्टबँड देखील लाँच केले आहे. या न्यूरल रिस्टबँडच्या मदतीने न्यूरल हँडराइटिंग कंट्रोल केली जाऊ शकते. हे रिस्टबँड यूजरच्या हाताच्या इशाऱ्यांना ट्रॅक करते आणि इनपुट समजू शकते. याचा अर्थ असा आहे की, जर एखादा यूजर हवेत काही लिहीण्याचा प्रयत्न करत असेल तर रिस्टबँड ही क्रिया फोनवर ट्रांसफर करणार आहे. याच्या मदतीने मेसेज टाईप करणं आणि इंटरफेस कंट्रोल करण्यासारखी कामं अगदी सहजपणे केली जाऊ शकतात. स्मार्ट ग्लासेससाठी नवीन फीचर रोलआऊट करण्यात आल्यानंतर हवेत इशारा करून व्हॉट्सअॅप, मेसेंजर आणि इंस्टाग्रामसह अनेक अॅप्ससाठी मेसेज टाईप केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Meta )
न्यूरल हँडराइटिंग फीचर व्यतिरिक्त मेटाने त्यांच्या स्मार्ट ग्लासेससाठी अनेक फीचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये डिस्प्ले रेकॉर्डिंग, आणि एक्सपांडेड लाईव्ह कॅप्शन सपोर्टसह नेविगेशन देखील सुधारण्यात आले आहे. यामधील काही फीचर्स आधीच लिमिटेड अर्ली एक्सेससह ऑफर करण्यात आले आहेत. मेटाची अशी इच्छा आहे की, रोजच्या जीवनात त्यांचे गॅझेट्स अतिशय फायदेशीर ठरावे.
जर काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर हवेत हात हलवून मेसेज टाईप करणं थोडं फिल्मी आणि ड्रामॅटिक वाटत होतं. पण आता एआयमुळे सर्वकाही शक्य झालं आहे. ज्या गोष्टी काही वर्षांपूर्वी केवळ फिल्मी आणि ड्रामॅटिक वाटत होत्या, त्या सर्व गोष्टी आता एआयमुळे करणं शक्य झालं आहे. केवळ एआयचं नाही तर रोबोटिक्स सेक्टरमध्ये देखील मोठी प्रगती होत आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमाच्या जगात दिसणारे रोबोट्स आता खऱ्या जगात देखील पाहायला मिळत आहेत.






