Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा... डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्...
Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित
आतापर्यंत जेव्हा स्टोरीमध्ये काही गडबड व्हायची तुम्हाला संपूर्ण स्टोरी डिलीट करून पुन्हा शेअर करावी लागत होती. मात्र आता असं होणार नाही. कारण आता इंस्टाग्राम नव्या फीचरवर काम करत आहे. आता यूजर्सना स्टोरी एडीट करण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही स्टोरी पोस्ट करताना कंटेट टाईप करायचा राहिला असेल किंवा काही चुकलं असेल तर तुम्हाला आता स्टोरी डिलीट करावी लागणार नाही. तर तुम्ही एडीट करू शकणार आहात. हे फीचर आयओएस यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. सध्या काही ठरावीक यूजर्ससाठी कंपनी हे फीचर रोलआऊट करून त्याची चाचणी करणार आहे. त्यानंतर सर्व यूजर्सना नवीन फीचर वापरण्याचा अनुभव मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडियावर काही यूजर्सनी या नव्या अपडेटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. स्टोरी शेअर केल्यानंतर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर एक मेन्यू ओपन होईल. इथे यूजर्सना एडीट ऑप्शन मिळणार आहे. या पर्यायवर टॅप केल्यानंतर एक वॉर्निंग पॉप-अप होईल. यामध्ये लिहीले असेल की, एडिटिंग सुरु केल्यानंतर स्टोरीचे ऑरिजनल वर्जन डिलीट होणार आहे. स्टोरीवरील लाइक्स, रिएक्शन आणि कमेंट देखील रिसेट होतील. यूजर्स स्टोरीमधील टेक्स्ट, कॅप्शन, स्टिकर्स, इमोजी, लिंक्स आणि टॅग्समधील कोणती माहिती एडीट करू शकतात, याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही.
इंस्टाग्रामचे स्टोरी एडीट फीचर सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. अँड्रॉईड यूजर्सना या नव्या फीचरसाठी काही काळ वाट पाहावी लागू शकते. इंस्टाग्रामने अद्याप याबद्दल काहीही सांगितलेले नाही, परंतु असे मानले जाते की हे फीचर लवकरच आणले जाईल. या नव्या फीचरचा अनुभव घेण्यासाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत.






