Share Market Today: जागतिक संकेतांचा भारतीय बाजारावर परिणाम; सपाट सुरुवात होण्याची शक्यता, ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष
Todays Gold-Silver Price: सोनं झालं स्वस्त; चांदी महागली! मुंबई, दिल्लीसह इतर शहरांतील दर जाणून घ्या
सोमवारी, भारतीय शेअर बाजारात दिवसाच्या नीचांकी पातळीवरून जोरदार सुधारणा झाली आणि तो सकारात्मक कलसह स्थिरावला. सेन्सेक्स ७७.०५ अंकांनी, म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढून ७५,३१५.०४ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ६.४५ अंकांनी, म्हणजेच ०.०३ टक्क्यांनी वाढून २३,६४९.९५ अंकांवर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक १७३.३५ अंकांनी, म्हणजेच ०.३२ टक्क्यांनी घसरून ५३,५३७.०० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये एंजल वन, आयसीआयसीआय बँक आणि एबीबी इंडिया यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मॅनकाइंड फार्मा आणि झायडस लाइफसायन्सेस, ल्युपिन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, आयशर मोटर्स, अदानी ग्रुप, ऍस्ट्रल, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अपोलो मायक्रो सिस्टम्स, डोम्स इंडस्ट्रीज, वास्कॉन इंजिनियर्स या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज मंगळवारी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पीबी फिनटेक, किंगफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी (इंडिया) आणि डॉ. लाल पाथ लॅब्स या 5 स्टॉक्सची निवड केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज (BSE) आणि पीबी फिनटेकचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.






