डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: वर्ष 2024 मधील नोबेल पारितोषिक वितरणाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत बुधवारी रसायशास्त्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कर डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आमि जॉन जम्पर यांना प्रदान करण्यात आला आहे. या तीन संशोधकांनी प्रथिनांवर केलेल्या कामगिरीबद्दल हा बहुमान मिळाला आहे. बेकर वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत आहेत, तर हसाबिस आणि जम्पर हे दोन्ही संशोधक लंडनमधील Google DeepMind येथे काम करतात.
रसायनशास्त्रातीस नोबेल पुरस्कारची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी केला. यासिवाय नोबेल समितीने दिलेल्या माहितीनुसार 2003 मध्ये, बेकरने एक नवीन प्रथिने तयार केली आणि तेव्हापासून त्यांच्या संशोधन गटाने प्रथिने, लस, नॅनोमटेरिअल्स आणि लहान सेन्सर म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्रथिनांसह अनेक कल्पनाशील प्रथिनांवर अभ्यास करण्यास सुरूवात केली.
प्रोटीन रचना स्पष्ट करणारे AI मॉडेल
नोबेल समितीने म्हटले आहे की हसाबिस आणि जम्परने 200 दशलक्ष प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावू शकणारे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल तयार केले आहे. क्वांटम डॉट्सवरील कामासाठी गेल्या वर्षी तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्र पारितोषिक देण्यात आले होते. याशिवाय फिजीओलॉजी आणि वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला आहे. तर भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कधील उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकन प्रोफेसर John J. Hopfield आणि Geoffrey Hinton यांना प्रदान करण्यात आला आहे.
नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिक 7 ते 14 ऑक्टोबर कालावधीत जाहीर होणार आहेत. उर्वरित पाच पुरस्कारांची घोषणा काही दिवसांत केली जाणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये हा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मोंगी जी बावेंडी, लुईस ई ब्रूस आणि ॲलेक्सी I एकिमोव्ह यांना देण्यात आला होता. या शास्त्राज्ञांनी क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.