WhatsApp सोबत फेसबूक अकाऊंट करू शकता लिंक, लवकरच येणार आहे नवं फीचर! युजर्स असा करू शकतात वापर
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपसाठी कंपनी सतत नवीन नवीन फीचर्स घेऊन येत असते. अलीकडेच कंपनीने व्हाट्सअप स्टेटस आणि व्हाट्सअप चॅटिंगसाठी अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत. या फीचर्समुळे व्हाट्सअप वापरण्याचा अनुभव अधिक चांगलं झाला आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या व्हाट्सअपसाठी इंस्टाग्रामसारखा एक नवा फीचर्स रोल आऊट केला होता. हे फीचर्स म्हणजे व्हाट्सअप वापरणाऱ्या युजर्ससाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या नव्या फीचर्समुळे युजर नंबरशिवाय देखील इतरांसोबत चॅटिंग करू शकणार आहेत. यानंतर आता कंपनीने आणखी एक नवीन फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर फेसबुक सोबत जोडलेले आहेत.
कंपनीने सोशल मीडिया लिंकिंग ऑप्शन अधिक वाढवले आहेत. आता कंपनीने फेसबुक युजर्सना त्यांचे अकाउंट व्हाट्सअप प्रोफाइल पेजमध्ये ऍड करण्याचा नवीन ऑप्शन दिला आहे. आतापर्यंत युजर्स इंस्टाग्राम अकाउंट व्हाट्सअप प्रोफाइल पेजमध्ये ऍड करू शकत होते. आता युजर्स फेसबुक अकाउंट देखील त्यांच्या प्रोफाईल पेजमध्ये ऍड करू शकणार आहेत. त्यामुळे इतर युजर्स इंस्टाग्राम आणि फेसबूकवर जोडले जाणार आणि आयडेंटिटी व्हेरिफाय करणं अगदी सहज शक्य होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हाट्सअपने हे नवीन फीचर त्यांच्या अँड्रॉइड बिटा युजरसाठी रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आणि अनेक युजरने या नवीन फीचरची पुष्टी देखील केली आहे. त्यामुळे सर्व युजर्सना लवकरच हे फीचर मिळणार आहे. आतापर्यंत व्हाट्सअप बिजनेस अकाउंटवर फक्त वेरिफाईड सोशल मीडिया लिंक्स दाखवल्या जात होत्या. परंतु नवीन फीचरमुळे इतर युजर्स देखील त्यांची सोशल मीडिया लिंक्स व्हाट्सअप प्रोफाइल पेजवर ऍड करू शकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार फेसबुक प्रोफाईल लिंक केल्यानंतर हे अकाउंट यूजर्सच्या व्हाट्सअप प्रोफाइल पेजवर दिसणार आहे. जेव्हा दुसरे युजर्स या लिंकवर क्लिक करतील तेव्हा ते या युजर्सच्या फेसबुक अकाउंटला भेट देणार आहेत. ज्या युजर्सना त्यांचे अकाउंट लिंक करायचे आहे, असे यूजर्स मेटाच्या अकाउंट सेंटरला भेट देऊन त्यांची लिंक व्हेरिफाय करू शकतात. एकदा लिंक व्हेरिफाय झाली की त्या लिंक शेजारी एक लहान फेसबुक आयकॉन दिसेल. त्यामुळे हे समजेल की ही लिंक खरी आहे की फ्रॉड आहे.
याशिवाय आणखी एक फीचर म्हणजे कंपनीने आयफोन युजर्ससाठी इन ॲप ट्रान्सलेशन फीचर्स रोल आउट करण्यास देखील सुरू वातकेली आहे. आता हे फीचर हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, चायनीज, स्पॅनिश आणि कोरियनसह 21 भाषांना सपोर्ट करते. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना सर्वात आधी लँग्वेज पॅक डाऊनलोड करावा लागणार आहे. एकदा लँग्वेज पॅक डाउनलोड केला की युजर्स हे फीचर वापरू शकणार आहेत. हे फीचर वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची देखील गरज नाही.