उत्तम पिक्चर क्वालिटी असलेले मोबाईल फोन सगळे हाताळतात. त्यात सोशल मिडीयामुळे फोटो, व्हिडीओ घेण्याची क्रेझ अधिकचं वाढली आहे. अगदी मॉर्निंग मोटीव्हेशन ते नाईट ड्रिमिंग पर्यतचा मोमेंट प्रत्येकाला आपल्या आठवणीत ठेवायचा आहे आणि त्यासाठी तो क्षण आवर्जुन कॅमरात टिपल्या जातो. पण आपल्या फोटोजमध्ये असे काही फोटो असतात जे आपण आपल्या गॅलरीत ठेवू शकत नाही. असे फोटो सेव्ह करुन ठेवायचे कुठे हा म्हणजे एक मोठा प्रश्न.
हा सगळा गोंधळ टाळण्यासाठीचं गुगल एक भन्नाट सिक्युरिटी फिचर घेवून आला आहे. ज्याच्या माध्यमातून तुमचे फोटो तुमच्याचं जिमेल अकाउंटवर सुरक्षितही असतील, ते तुमच्या फोनमध्ये कुणाला दिसणार ही नाही तसेच तुमच्या परवानगीशिवाय ते फोटो कधी डिलीट पण होणार नाहीत. गुगल फोटो कडून नवा प्रायव्हसी फिचर लॉंच करण्यात आला आहे. ज्याचं नाव आहे लॉक्ड फोल्डर्स. या फोल्डरच्या मदतीने तुम्ही तुमच्या खासगी फोटो किंवा कुठल्याही प्रकारचा डेटा हाईड करु शकता.
सेटिंग्ज उघडल्यानंतर तुम्हाला मेनू ऑप्शन दिसेल. मेनूवर गेल्यास तुम्हाला मेमरी सेटींग्ज दिसेल. तिकडे तुम्हाला हाईड कराचे असलेले फोटो निवडा आणि तुमचे फोटो हाईड करा. यानुसार तुमचे फोटो हाईड केल्यावर तुम्हाला तुमचे फोटो फोन गॅलरीत दिसणार नाहीत पण गुगल फोटो मेमरी ऑप्शनमध्ये हे फोटो तुम्हाला सहज सापडतील.