ड्रायव्हिंगदरम्यान WhatsApp मेसेजची चिंता संपली! गाडी चालवताना करू शकता चॅटिंग, असं आहे नवं फीचर
व्हॉट्सअॅपचे नवीन वर्जन विशेषत: गाडीमध्ये वापर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यापूर्वी यूजर्स केवळ सिरी सारख्या व्हॉईस असिस्टंटद्वारे मेसेज ऐकू किंवा पाठवू शकत होते. मात्र याचा कंट्रोल अत्यंत मर्यादित होता. नव्या फीचरनंतर हा अॅप आता थेट गाडीच्या इंफोटेनमेंट स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे आता यूजर्स थेट स्क्रीनवरून चॅट, कॉल आणि कॉन्टॅक्ट्सपर्यंत पोहोचू शकणार आहेत. यानंतर आता यूजर्सना वॉईस बेस्डपासून एक विजुअल आणि सोपा इंटरफेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जेव्हा तुम्ही तुमचा आयफोन कारप्लेसोबत कनेक्ट करता तेव्हा व्हॉट्सअॅप आपोआप गाडीच्या स्क्रीनवर दिसू लागतो. यानंतर यूजर्स अगदी सहजपणे अनेक कामं पूर्ण करू शकतात. तसेच यूजर्स अलीकडील चॅट्स आणि फेवरेट कॉन्टॅक्ट्स देखील पाहू शकणार आहेत. तसेच व्हॉट्सअॅप कॉल करू शकणार आहेत आणि रिसिव्ह देखील करू शकणार आहेत. तसेच व्हॉईस मेसेज देखील पाठवू शकणार आहेत. इतकंच नाही तर यूजर्स कॉल हिस्ट्री आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील एक्सेस करू शकणार आहेत. मात्र, सुरक्षिततेचा विचार करता, गाडी चालू असताना संपूर्ण चॅट उघडण्यास परवानगी नाही, जेणेकरून चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होणार नाही.
पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?
या अपडेटमधील सर्वात मोठा बदल त्याचे नवीन आणि स्वच्छ इंटरफेस आहे. यामध्ये फेवरेट कॉन्टॅक्ट्सचा एक वेगळा सेक्शन दिला आहे. याद्वारे तुम्ही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहात. कॉल हिस्ट्री देखील अगदी सहज पाहू शकणार आहात. यामध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग दोन्ही कॉल्सची माहिती मिळणार आहे. कॉन्टॅक्ट प्रोफाइल आणि क्विक कॉल ऑप्शन देखील जोडण्यात आला आहे. ज्यामुळे कॉल करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची देखील गरज नाही.
गाडी ड्राईव्ह करणाऱ्या लोकांसाठी हे फीचर जास्त फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांना चॅटिंग करण्यासाठी हातांचा वापर करण्याची गरज भासणार नाही. यामुळे ड्रायव्हिंग दरम्यान तुमचे लक्ष रस्त्यावरून दुसरीकडे भटकणार नाही. प्रवाशांनाही हे वैशिष्ट्य उपयुक्त वाटेल. ते प्रवास करताना सहजपणे कॉल करू शकतात किंवा छोटे उत्तर पाठवू शकतात. आवडत्या संपर्कांमुळे महत्त्वाच्या लोकांशी त्वरित संपर्क साधणेही सोपे होते.






