सावधान! या धोकादायक ॲप्स डाउनलोड करताच तुमचे बँक अकाउंट होईल रिकामे, FBI ने जारी केला अलर्ट
स्मार्टफोनच्या वापरामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. आजकाल प्रत्येक कामासाठी आपल्याला आपल्या स्मार्टफोनची गरज भासते. पर्सनल कामांपासून ते प्रोफेशनल कामांपर्यंत आपल्याला आपल्या स्मार्टफोनची फार मदत होत असते. परंतु त्यासोबतच सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. स्मार्टफोन युजर्सना काही धोकादायक ॲप्सपासून दूर राहण्याचा सल्ला देत अलीकडेच एक गंभीर इशारा जारी करण्यात आला आहे. हे ॲप्स खरे दिसतात, परंतु ते डाउनलोड केल्यावर ते तुमचा पर्सनल डेटा हॅकर्सच्या समोर आणू शकतात.
FBI ने जारी केला अलर्ट
अमेरिकेची सुरक्षा एजन्सी एफबीआयने (FBI) 18 जानेवारी रोजी या धोक्याबाबत अलर्ट जारी केला होता. या धोकादायक ॲप्सच्या माध्यमातून अनेक बँक अकाउंट्सना लक्ष्य करण्यात आल्याचे एजन्सीने म्हटले आहे. या ॲप्सद्वारे, हॅकर्स डिव्हाइसमध्ये प्रवेश करतात आणि नंतर बँक कर्मचारी असल्याचे दाखवून युजर्सची फसवणूक करतात. हॅकर्स युजर्सना त्यांच्या बँक अकाउंटवर हल्ला झाल्याचे सांगण्यासाठी ‘फँटम हॅकर’ तंत्राचा वापर करतात. घाबरून, लोक त्यांचे पैसे “सुरक्षित” अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करतात, जे प्रत्यक्षात स्कॅमर्ससाठी एक सापळा आहे.
Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा
या ॲप्सना चुकूनही डाउनलोड करू नका
व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे मिळालेल्या लिंकवरून ॲप्स डाउनलोड करू नका
ईमेलद्वारे पाठवलेल्या लिंक किंवा APK फाइल्सवर विश्वास ठेवू नका
थर्ड पार्टी ॲप स्टोअरमधून ॲप्स डाउनलोड करणे टाळा
सोशल मीडियावर आढळलेल्या रीडायरेक्ट लिंकवर क्लिक करू नका
ॲपची सत्यता तपासा
कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रेटिंग, रिव्ह्यू आणि डेव्हलपरविषयीची माहिती तपासा
बँकिंग ॲप्स काळजीपूर्वक डाउनलोड करा
बँकिंग किंवा वित्तीय ॲप्स फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा
बनावट ॲप्सपासून सावध राहा
गुगल आणि ॲपल स्टोअरवर उपलब्ध असलेले बनावट ॲप्स टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा
अनावश्यक परवानग्या देऊ नका
घाईघाईत अनेकदा आपण ॲप्सच्या सर्व पेरमिशन्स एक्सेप्ट करतो मात्र असे करणे धोक्याचे ठरू शकते. कोणत्याही ॲपला अनावश्यक पेरमिशन्स देणे टाळा
या गोष्टी ध्यानात असूद्यात
हॅकर्स सतत नवनवीन मार्गाने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. स्मार्टफोन युजर्सने सावध असले पाहिजे आणि कोणत्याही अज्ञात लिंक्स किंवा ॲप्सवर क्लिक करण्यापूर्वी त्यांची सत्यता सुनिश्चित केली पाहिजे. तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या बँक अकाउंटला रिकामे करू शकते. त्यामुळे, सतर्क रहा आणि तुमच्या डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य द्या.