Poco C85 5G: बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! पोकोचा नवा स्मार्टफोन उडवणार सर्वांची झोप, फीचर्स टॉप क्लास
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, Poco C85 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होते. डिव्हाईसच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाल्या हाय-एंड व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिव्हाईसच्या टॉप व्हेरिअंट 8GB+128GB ची किंमत 14,499 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. ज्यामुळे 4GB व्हेरिअंट 11,999 रुपये आणि 6GB व्हेरिअंट 12,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन कंपनीने मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पावर ब्लॅक कलरमध्ये लाँच केला आहे.
POCO C85 5G price in India. https://t.co/O3hVuvhYUR pic.twitter.com/vzoxbARkeb — Mukul Sharma (@stufflistings) December 9, 2025
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.9 इंचाचा फ्लॅट HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील दिला आहे. डिव्हाईसमध्ये 810 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी ऑक्टा कोर 6nm मीडियाटेक 6300 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये माली-G57 MC2 GPU आहे. Poco C85 5G मध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे.
कंपनीने या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये HyperOS 2.2 दिला आहे. जो गेल्यावर्षीच्या Android 15 वर बेस्ड आहे. एवढंच नाही तर कंपनी या नवीन स्मार्टफोनला दोन वर्षांसाठई Android अपग्रेड आणि 4 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट देणार आहे. डिव्हाईसला TÜV रीनलँड लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री आणि सर्कैडियन फ्रेंडली सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे. फोनमध्ये डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंससाठी IP64 रेटिंग दिली आहे.
Tech Tips: स्मार्टवॉच घालूनच झोपताय? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक, सत्य वाचून तुम्हीही घाबराल
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि एक QVGA कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पुढील बाजूला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
Ans: POCO ही Xiaomi पासून स्वतंत्र झालेली स्मार्टफोन ब्रँड आहे, जी बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये उच्च परफॉर्मन्सचे स्मार्टफोन्स देण्यासाठी ओळखली जाते.
Ans: POCO फोन कमी किंमतीत फ्लॅगशिपसारखे प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी फीचर्स देतात. त्यामुळे ते बजेटमध्ये बेस्ट पर्फॉर्मन्स देतात.
Ans: बहुतेक POCO फोन ₹10,000 ते ₹20,000 दरम्यान उपलब्ध असतात, तर काही प्रीमियम मॉडेल्स यापेक्षा महाग असू शकतात.






