Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले...
सोशल मीडिया आणि अनेक वेबसाईटद्वारे केले जाणारे दावे चुकीचे आहेत. कंपनीने अद्याप भारतातील ग्राहकांसाठी कोणत्याही प्लॅनची घोषणा केली नाही, असं देखील पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे भारतातील ग्राहकांना स्टारलिंकच्या सर्विसचा लाभ घेण्यासाठी बरीच वाट पाहावी लागणार आहे. नक्की काय गडबड झाली आणि कंपनीची वेबसाईट अचानक लाईव्ह कशी झाली, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
The Starlink India website is not live, service pricing for customers in India has not yet been announced, and we are not taking orders from customers in India. There was a config glitch that briefly made dummy test data visible, but those numbers do not reflect what the cost… https://t.co/TU8cUjcYGL — Lauren Dreyer (@LaurenDreyer) December 8, 2025
सोमवारी काही रिपोर्ट समोर आले होते. या रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एलन मस्कच्या मालकीच्या स्टारलिंक कंपनीने भारतात त्यांच्या रेसिडेंशियल प्लॅनची घोषणा केली आहे. मात्र आता हे रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील यूजर्सच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन स्टारलिंक बिजनेस ऑपरेशंसची वाइस प्रेसिडेंट Lauren Dreyer यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतात स्टारलिंक इंडियाची वेबसाईट अद्याप लाईव्ह झाली नाही आणि आतापर्यंत किंमती देखील जाहीर करण्यात आल्या नाहीत. तसेच कंपनी भारतातील कंपनीकडून कोणतीही ऑर्डर स्विकारत नाही. हे सर्व एका कॉन्फिगरेशन ग्लिचमुळे झाले आहे. एका त्रुटीमुळे वेबसाईटवर डमी टेस्ट डेटा लीक झाला, त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला. पण या अधिकृत किंमती नाहीत. स्टारलिंकने अद्याप भारतात त्यांची कोणतीही सर्विस सुरु केली नाही. वेबसाईटवर दिसणारी माहिती ‘Placeholder डेटा’ होता आणि भारतातील किंमती अद्याप जाहिर करण्यात आल्या नाहीत.
Lauren Dreyer यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एक यूजर म्हणाला आहे की, हे सर्व खूप गोंधळात टाकणारे होते आणि भारतीय बाजारपेठेसाठी किंमत देखील थोड्या जास्त दिसत होत्या. तर दुसरा यूजरा म्हणाला आहे की, अधिकृत मंजुरीपूर्वी सॉफ्टवेअर बग म्हणून फक्त भारतातच सॅटेलाईट इंटरनेट सरु होऊ शकते शकते.
Ans: युजर टर्मिनल (डिश), Wi-Fi राउटर, केबल्स आणि माउंटिंग स्टँड मिळतो.
Ans: होय, Starlink ने भारतात अनलिमिटेड डेटासह प्लॅन्स जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहे.
Ans: होय, विशेषतः ग्रामीण भागात जिथे फाइबर इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे Starlink मोठी क्रांती घडवू शकते.






