Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा
Poco C85 5G मध्ये 6.9 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामुळे चित्रपट आणि व्हिडीओ पाहण्याची मजा अधिक वाढते. हा स्मार्टफोन HD+ रेजॉल्यूशनसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 810 निट्सची ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच, Lava Play Max 5G हा फोन 6.72 इंच स्क्रीन ऑफर करतो. यामध्ये FHD+ रेजॉल्यूशन आहे. म्हणजेच लावाच्या स्क्रीनवर कंटेंट जास्त स्वच्छ आणि क्रिस्प दिसणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Poco C85 5G चा हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर आधारित आहे. हा रोजच्या कामांसाठी आणि मल्टीटास्किंग एक चांगला प्रोसेसर आहे. तसेच, Lava Play Max 5G या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट देण्यात आला आहे. जो Poco च्या प्रोसेसरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळे प्रोसेसरच्या बाबतीत Lava ने बाजी मारली आहे.
Poco C85 5G स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची जंबो बॅटरी दिली आहे. कमी रेजॉल्यूशनवाली स्क्रीन आणि मोठी बॅटरी यामुळे हा स्मार्टफोन 1.5 ते 2 दिवस एकदा चार्ज केल्यावर वापरला जाऊ शकतो. Lava Play Max 5G मध्ये स्टँडर्ड 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. मात्र बॅकअपच्या बाबतीत पोकोने बाजी मारली आहे.
Poco C85 5G आणि Lava Play Max 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 8MP चा शूटर असण्याची शक्यता आहे.
Poco C85 5G ची किंमत ऑफर्सअंतर्गत 11,999 रुपयांपासून सुरु होते. Lava Play Max 5G ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरु होते.
जर तुम्हाला दीर्घ बॅटरी लाइफ आणि मोठी स्क्रीन (चित्रपट/मालिका पाहण्यासाठी) पाहिजे असेल आणि तुम्हाला 1000 रुपयांची बचत करायची असेल, तर पोकोचा Poco C85 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल, हेवी अॅप्स चालवायचे असतील आणि तुम्हाला शार्प डिस्प्ले (FHD+) हवा असेल, तर Lava Play Max 5G बेस्ट निवड असणार आहे.






