रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य
आपण रोज वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. तंत्रज्ञान जगात रोज नवीन नवीन शोध लावले जात आहेत. मात्र येत्या काही काळात काही तंत्रज्ञान असे आहेत जे इतिहासात जमा होणार आहेत. एका काळ असा होता जेव्हा पेजर, फ्लॉपी डिस्क आणि ब्लैकबेरी आपल्या जीवनात रोज वापरले जात होते, मात्र आज हे तंत्रज्ञान इतिहासात जमा झाले आहे. मात्र आता तज्ज्ञांनी पुन्हा एकदा अशा काही तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं आहे, जे येत्या काही काळात इतिहासाचा हिस्सा बनणार आहे. 2030 पर्यंत हे तंत्रज्ञान संपणार आहेत.
डेटा ट्रांसफर करण्यासाठी यूएसबी ड्राइव आणि मेमोरी कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मात्र आता हे तंत्रज्ञान लवकरच इतिहासात जमा होणार आहे. क्लाउड स्टोरेज आणि हाई-स्पीड इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे Google Drive, OneDrive आणि iCloud सेवांचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत यूएसबी ड्राइव आणि मेमोरी कार्डचा वापर अत्यंत कमी झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आज प्रत्येक घरातील टिव्हीसाठी रिमोट कंट्रोलचा वापर केला जात आहे. मात्र आगामी काळात स्मार्ट वॉयस असिस्टेंट आणि मोबाइल अॅप्स रिमोट कंट्रोलची जागा घेणार आहे. त्यामुळे टिव्हीचा वापर करण्यासाठी लवकरच केवळ आपल्याला Hey Google किंवा Alexa बोलावं लागणार आहे.
पासवर्ड लक्षात ठेवणं अतिशय कठिण काम आहे. अशाच परिस्थितीत या तंत्रज्ञानासाठी पर्याय मार्ग म्हणजे बायोमेट्रिक सिक्योरिटी, फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट स्कॅन सारखे तंत्रज्ञान आहेत. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की पुढील पाच ते सात वर्षांत बायोमेट्रिक प्रणाली पासवर्ड पूर्णपणे बदलू शकते.
UPI, डिजिटल वॉलेट्स आणि स्मार्टवॉच पेमेंट्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे येणाऱ्या काळात प्लास्टिक कार्ड्सचे चलन संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लोकं सध्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोन किंवा वॉचमधील पेमेंट अॅपचा वापर करत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत ही बँकिंग सिस्टम देखील संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्लूटूथ आणि वायरलेस ऑडियो डिवाइसने लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. अॅपल आणि इतर कंपन्यांनी आधीच वायर्ड इयरफोन्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात, वायरलेस तंत्रज्ञान जलद, स्वस्त आणि अधिक सोयीस्कर बनत असल्याने ते बाजारातून पूर्णपणे गायब होऊ शकतात.
टेक्नोलॉजी म्हणजे काय?
टेक्नोलॉजी म्हणजे वैज्ञानिक ज्ञान आणि साधनांचा वापर करून मानवी जीवन सुलभ करण्यासाठी तयार केलेली यंत्रणा, प्रणाली किंवा पद्धत.
टेक्नोलॉजीचे प्रकार कोणते आहेत?
मुख्यतः Information Technology (IT), Communication Technology, Biotechnology, Artificial Intelligence (AI), Robotics, Automation, आणि Renewable Energy Technology हे प्रमुख प्रकार आहेत.
टेक्नोलॉजी आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करते?
टेक्नोलॉजीमुळे संवाद, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, मनोरंजन आणि कामकाज हे सर्व क्षेत्र अधिक जलद आणि सोपे झाले आहेत.






