कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स
एलन मस्कच्या मालकीच्या प्लॅटफॉर्म एक्सवर गेल्या महिन्यात एक नवीन फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स स्टिल इमेज व्हिडीओमध्ये बदलू शकतात. हे पोस्ट कंपोजरद्वारे तयार करू शकता. एक्सवरील हे फीचर Grok Imagine च्या मदतीने तुमचे फोटो निवडून AI च्या मदतीने हे फोटो व्हिडीओमध्ये बदलू शकणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी टूल किंवा एडिटिंग स्किलची गरज नसेल.
AI स्वत:च फोटोमध्ये मोशन इफेक्ट, बॅकग्राउंड म्यूजिक आणि सिनेमॅटिक ट्रांजिशन जोडून इमेजला व्हिडीओमध्ये बदलले जाणार आहे. सध्या हे फीचर iOS यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे आणि हे फीचर लवकरच अँड्रॉई़ड युजर्ससाठी देखील रोलआऊट केलं जाणार आहे. ईमेजला व्हिडीओमध्ये बदलण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे लेटेस्ट वर्जन तुमच्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. App Store वर जाऊन एक्स अपडेट करा. त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही फोटोला व्हिडीओमध्ये बदलू शकता.
लक्षात ठेवा ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला Grok अॅप इंस्टॉल करावे लागेल आणि या अॅपवर लॉगिन करावं लागणार आहे. पण त्यानंतर, सिस्टम बॅकग्राउंडमध्ये सर्वकाही आपोआप हाताळते. काही सेकंदात, तुमची स्टिल इमेज शेअर करण्यासाठी तयार असलेल्या लहान व्हिडिओमध्ये रूपांतरित होते.
Grok चे एनिमेशन इंजिन डीप जनरेटिव AI चा वापर करते. ज्यामुळे रियलिस्टिक मोशन बनेल. हे तुमच्या फोटोमध्ये वस्तू, लाइटिंग आणि डेप्थ समजून घेते आणि सिनेमॅटिक पॅन शॉटसारखा दिसणारा क्रम तयार करते. हा तयार करण्यात आलेला व्हिडीओ तुम्ही एक्स, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवर शेअर करू शकता किंवा फोनमध्ये सेव्ह करू शकता.
X म्हणजे काय?
X हा Twitter चा नवीन नावाने ओळखला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जिथे वापरकर्ते पोस्ट्स (tweets), फोटो, व्हिडिओ आणि लाइव्ह अपडेट्स शेअर करू शकतात.
Twitter चे नाव X का ठेवले गेले?
Elon Musk यांनी Twitter ला “X” या नावाने रिब्रँड केलं आहे, कारण त्यांचा उद्देश “Everything App” तयार करण्याचा आहे — म्हणजेच मेसेजिंग, पेमेंट, आणि कंटेंट सर्व एकाच ठिकाणी.
X अकाऊंट कसे तयार करायचे?
X च्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवर जा. “Sign Up” क्लिक करा आणि तुमचा ईमेल / मोबाइल नंबर वापरून अकाऊंट तयार करा. यूजरनेम आणि पासवर्ड सेट करा. अशा प्रकारे तुम्ही एक्स अकाऊंट तयार करू शकता.






