Raksha Bandhan 2025: यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज! स्वस्तात खरेदी करा iPhone 15, या ठिकाणी मिळतेय जबरदस्त Deal!
येत्या काही दिवसांतच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. बहिण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा सण आहे. रक्षाबंधनानिमित्त भाऊ त्याच्या बहिणीला भेटवस्तू देतो. पण अनेक भावांची एकच समस्या असते. ती म्हणजे यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यायचं? तुमचा देखील असाच गोंधळ उडाला आहे का, तर काळजी करू नका. आता आम्ही तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी एक बेस्ट गिफ्ट सांगणार आहे. असं गिफ्ट जे पाहून तुमची बहिण आंनदाने उड्या मारू लागेल.
दरवर्षी रक्षाबंधनाला ड्रेस किंवा चॉकलेट्स देण्यापेक्षा यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला एक प्रिमियम स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. हा प्रिमियम स्मार्टफोन म्हणजेच iPhone 15. पण iPhone 15 खरेदी करायचं असेल तर भरपूर पैसे लागतील, असं तुम्हाला वाटतंय का? थांबा, रक्षाबंधनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ऑफर्सअंतर्गत तुम्ही कमी पैशांत आणि डिस्काऊंटसह iPhone 15 खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकेल. रक्षाबंधनापूर्वी iPhone 15 वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वरून तुम्ही कमी किंमतीत iPhone 15 खरेदी करू शकता. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर फोनची किंमत खूप कमी झाली आहे. कोणत्याही ऑफरशिवाय iPhone 15 तुम्ही 61,400 रुपयांना खरेदी करू शकता. पण ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या फोनची किंमत खूप कमी झाली आहे. तुम्ही या फोनच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता. कंपनीने हा स्मार्टफोन 2023 मध्ये लाँच केला होता. अद्यापही लोकांमध्ये या स्मार्टफोनची क्रेझ आहे. या फोनमध्ये उत्तम कॅमरे आणि हाय-परफॉर्मेंस चिपसेट देण्यात आला आहे.
ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वर iPhone 15 च्या 128GB व्हेरिअंटची किंमत कोणत्याही ऑफरशिवाय 61,400 रुपये आहे. मात्र तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या स्मार्टफोनवर 8000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. बँक ऑफरसह तुम्हाला या स्मार्टफोनवर आणखी डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. बँक ऑफर्ससह, तुम्ही iPhone 15 आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon Pay बॅलन्सद्वारे पेमेंट केल्यास Amazon 1,842 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे.
याशिवाय, एक्सचेंज ऑफरसह तुम्ही फोन आणखी स्वस्तात मिळवू शकता. जर तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला 49,150 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही iPhone 11 एक्सचेंज केला तर तुम्ही 11,700 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ऑफरनंतर, फोनची किंमत 49,700 रुपये होईल.






