Ray-Ban चे नवीन Smart ग्लासेस भारतात लाँच, Meta AI आणि 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज; किंमत 30 हजारांहून कमी
स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट ईअरबड्स या गॅझेट्ससोबतच आता स्मार्ट ग्लासेसची क्रेझ देखील प्रचंड वाढली आहे. तुम्ही देखील नवीन किंवा तुमच्या आयुष्यातील पहिले स्मार्ट ग्लासेस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Ray-Ban Meta Glasses भारतात लाँच करण्यात आले आहेत. EssilorLuxottica च्या सहकार्याने हे नवीन ग्लासेस डेव्हलप करण्यात आले आहे. या ग्लासेसची किंमत देखील 30 हजारांहून कमी आहे.
रे-बॅन मेटा ग्लासेसची भारतातील किंमत Skyler आणि Wayfarer डिझाईन्ससाठी Shiny Black कलर ऑप्शनमध्ये 29,900 रुपयांपासून सुरु होते. Wayfarer Matte Black ऑप्शनची किेंमत 32,100 रुपये आहे. तर Skyler Chalk Grey आणि Wayfarer Matte Black डिझाईन्सची किंमत 35,700 रुपये आहे. या स्मार्ट ग्लासेसची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. 19 मेपासून Ray-Ban.com आणि मेजर ऑप्टिकल आणि सनग्लास स्टोर्सद्वारे हे स्मार्ट ग्लासेस खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य: X)
रे-बॅन मेटा ग्लासेसमध्ये 12-मेगापिक्सल कॅमेरा आणि LED लाइट देण्यात आली आहे, जी फ्रेमच्या दोन्हीं बाजूला गोल कटआउटमध्ये लागली आहे. LED लाइट वीडियो रिकॉर्डिंगवेळी इंडिकेटरचे काम करते. कॅमेरा 3,024 x 4,032 पिक्सेल रेजोल्यूशनमध्ये फोटो क्लिक करतो आणि 60 सेकंदपर्यंत 1080p व्हिडीओ रिकॉर्ड करतो. हे व्हिडीओ तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या मेटा अॅप्सवर शेअर करू शकता.
कॅमेरा आणि पाच माइक सिस्टमसह, हे ग्लासेस फेसबुक आणि इंस्टाग्राम फर्स्ट-पर्सन पर्सपेक्टिवमध्ये लाइव स्ट्रीमिंगची सुविधा देतात. हे क्वालकॉम Snapdragon AR1 Gen1 प्लॅटफॉर्म प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि 32GB इनबिल्ट स्टोरेजस येतं. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट ग्लास सिंगल चार्जवर चार तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतो आणि चार्जिंग केससह 32 तासांची एडिशनल बॅटरी लाइफ दिली जाते. यामध्ये IPX4 रेटिंग आहे.
रे-बॅन मेटा ग्लास मेटा AI असिस्टेंटवर आधारित आहे. यूजर्स ‘Hey Meta AI’ वॉयस प्रॉम्प्टद्वारे हँड्स-फ्री फीचर्सचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ, यूजर्स ‘Hey Meta, what is this song?’ बोलून गाणं ओळखू शकतात. हे फीचर स्टोर किंवा कॅफेमध्ये वाजणाऱ्या गाण्याचा गायक सांगू शकतो. हे इंग्लिश आणि स्पॅनिश, फ्रेंच किंवा इटॅलियनचे रियल-टाइम स्पीच ट्रांसलेशन देखील ऑफर करतो. ‘Hey Meta, start live translation’ कमांडमुळे ट्रांसलेटेड ऑडियो ओपन-ईयर स्पीकर्सचा आवाज येतो.
यामध्ये मेटाने लाईव्ह AI फीचर देखील दिलं आहे, जे 12-मेगापिक्सल कॅमेराने रियल-टाइम व्हिडीओ फीड मॉनिटर करते. यूजर्स ‘Hey Meta’ शिवाय प्रश्न विचारू शकतात. आजूबाजूच्या परिसरातील माहिती देखील घेऊ शकतात. यूजर्स DM, फोटो, ऑडियो कॉल आणि वीडियो कॉल देखील ग्लासने सेंड आणि रिसीव करू शकतात.