Realme 14: 2025 चा दमदार 5G 'स्मार्ट'फोन लाँच! गेमिंगचा अनुभव होणार अधिक चांगला, इतकी आहे किंमत
स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांचा नवीन 5G आणि दमदार स्मार्टफोन Realme 14 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं लाँचिंग जागतिक बाजारात करण्यात आलं आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन Snapdragon 6 Gen 4 चिपसेटसह 12GB RAM ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सोपोर्टसह पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोन मोबाईल गेमर्ससाठी बेस्ट आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टफोनमुळे गेमर्सचा गेमिंग अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे.
मोबाईल गेमर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे गेम खेळताना सतत स्मार्टफोनची चार्जिंग कमी होते आणि फोन देखील हँग होतो. पण आता लाँच करण्यात आलेला Realme 14 5G स्मार्टफोन गेमिंगसाठी अतिशय बेस्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये गेमिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी GT Boost मोड देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं डिझाईन Realme Neo 7x सारखेच आहे. Realme Neo 7x स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला होता. आता याच डिझाईनशी मिळता-जुळता स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme 14 5G स्मार्टफोन थायलंडमध्ये दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB आणि 12GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंटची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. थायलंडमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 THB म्हणजेच सुमारे 35,300 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,999 THB म्हणजेच सुमारे 40,400 रुपये आहे. हा Realme फोन Mecha Silver, Storm Titanium आणि Warrior Pink रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
Realme 14 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 240Hz आणि पीक ब्राइटनेस 2,000nits आहे. हा Realme फोन Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 4 SoC सह सादर करण्यात आला आहे.
हा Realme फोन Android 15 वर आधारित Realme UI 6 वर चालतो. सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी Realme 14 5G स्मार्टफोन 6,050mm² VC लिक्विड कूलिंग सिस्टमसह येतो. या फोनमध्ये दिलेल्या GT बूस्ट मोडमुळे, तो 120 फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने गेमप्लेला सपोर्ट करतो.
कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, Realme 14 5G मध्ये AI पॉवर्ड 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हे ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सपोर्टसह येते. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.