Realme 14 Pro Lite 5G: भारतात लाँच झाला रिअलमीचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्सने सुसज्ज! वाचा स्पेसिफिकेशन्स
लोकप्रिय आणि आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या Realme ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme 14 Pro Lite 5G हा नवीन स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Realme 14 Pro Lite 5G हा स्मार्टफोन Realme 14 Pro सिरीजमधील एक नवीन स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Xiaomi, OPPO आणि Vivo सारख्या कंपन्यांच्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससोबत स्पर्धा करणार आहे.
कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग
Realme 14 Pro Lite 5G स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटीसह ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिप आणि 5200mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50MP शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत 25 हजारांहून कमी आहे. किंमत जरी कमी असली तरी या स्मार्टफोनमध्ये मजेदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला तर या नवीन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Realme 14 Pro Lite 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 8GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आहे.
Realme 14 Pro Lite मध्ये 6.7-इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हानिकारक किरणे कमी करण्यासाठी त्यात AI Eye प्रोटेक्शन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. त्याचे 2,160Hz PWM उच्च-फ्रिक्वेन्सी डिमिंग चांगला व्यूइंग अनुभव सुनिश्चित करते. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass 7i बसवण्यात आला आहे. हे ग्राहकांना ग्लास गोल्ड आणि पर्पल रंगांमध्ये उपलब्ध आहे.
सुपरफास्ट काम करण्यासाठी, या Realme स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आणि Adreno 710 GPU देण्यात आला आहे. स्मार्टफोन गरम होण्याची समस्या दूर करण्यासाठी, फोनमध्ये 3D VC कूलिंग सिस्टम आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 256 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि व्हर्च्युअल रॅम आहे.
Realme च्या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5200mAh जंबो बॅटरी दिली आहे. हे 45W वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi चे नवीन ईयरबड्स लाँच, मिळणार Harman ऑडियो आणि बरंच काही… जाणून घ्या किंमत
कनेक्टिव्हिटीसाठी, Realme 14 Pro Lite मध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 14 बेस्ड realme UI 5.0 वर काम करतो.