Realme GT 6 (फोटो सौजन्य - Realme.com)
कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य
Realme GT 6 मध्ये सापडलेला 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह सक्षम केला जाईल. हा Sony LYT-808 सेन्सर आहे, ज्याचा सेन्सर आकार 1/1.4 इंच आहे. यात f/1.69 चे मोठे अपर्चर आहे. Realme GT 6 चे हे कॅमेरा वैशिष्ट्य बाजारात उपस्थित असलेल्या अनेक फ्लॅगशिप लेव्हल स्मार्टफोनशी स्पर्धा करण्यास मदत करेल तसंच हा फोन कसा वेगळा आहे तेदेखील ठरवेल.
व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट
कंपनीने सांगितल्याप्रमाणे, नवीन Realme फोनचा मुख्य कॅमेरा 4K डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल. त्याची फोटो क्वालिटी उत्कृष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेराही दिला जाईल, जो मुख्य कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर दिला जाऊ शकतो.
हायपरटोन इमेज इंजिन
फोटोग्राफी सुधारण्यासाठी, Realme GT6 मध्ये हायपरटोन इमेज इंजिन देण्यात येणार आहे. यात टेक्सचर पोर्ट्रेट, फास्ट कॅप्चर, नाईट मोड, स्टार मोड, स्ट्रीट मोड, एआय स्मार्ट रिमूव्हल आणि एआय नाईट व्हिजन यांसारखी सर्व वैशिष्ट्ये असतील. हे आधीच सांगण्यात आले आहे की, Realme GT 6 मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर असेल. फोनला 5,500mAh बॅटरी दिली जाईल, जी 120W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 8T LTPO OLED डिस्प्ले असेल, जो 6000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देईल.