स्पॅम कॉल आणि मेसेजपासून मिळणार सुटका, TRAI ने जारी केले नवीन नियम; कंपन्यांना भरावा लागणार लाखोंचा दंड
स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजपासून तुम्ही देखील कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने नवीन नियम जारी केले आहेत. मोबाईल युजर्सना स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजपासून सुटका मिळावी या उद्देशाने हे नवीन निमय जारी करण्यात आले आहेत. ट्रायने जारी केलेल्या नियमांत सांगितलं आहे की, आता स्पॅम कॉल्सची संख्या योग्यरित्या न सांगणाऱ्या कंपन्यांना 2 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मॅसेजबाबत कठोर पावलं उचलावी लागणार आहेत.
Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स
ट्रायने सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना कॉल आणि एसएमएस पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत, जसे की असामान्यपणे जास्त कॉलची संख्या, कमी कॉल कालावधी आणि इनकमिंग-आउटगोइंग कॉलचे प्रमाण. यामुळे रिअल टाइममध्ये संभाव्य स्पॅमर्स ओळखणे सोपे होईल. ट्रायने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना असामान्यपणे ऑपरेटरना कॉल आणि एसएमएस पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे आदेश दिले आहेत जसे की अधिक कॉल करणारे, कमी कॉल कालावधी आणि इनकमिंग-आउटगोइंग कॉलचे प्रमाण. या पॅटर्नमुळे रिअल टाइममध्ये संभाव्य स्पॅम कॉल्सना ओळखणं अधिक सोपं होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ट्रायने जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास किंवा कंपनीने कोणतीही चुकीची माहिती दिल्यास दंड आकारला जाणार आहे. पहिल्यांदाच चुकीची माहिती दिल्याबद्दल 2 लाख रुपये दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा चुकीची माहिती दिल्याबद्दल 5 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. यानंतर, प्रत्येक चुकीसाठी कंपन्यांना 10 लाख रुपये दंड भरावा लागेल. अनसोलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन (UCC) चा नंबर चुकीच्या पद्धतीने दिल्याबद्दल हा दंड आकारला जाईल. हा दंड चुकीच्या पद्धतीने बंद केलेल्या तक्रारी, मॅसेज हेडर आणि कंटेंट टेम्प्लेटच्या नोंदणीमध्ये निष्काळजीपणा यासाठी आकरला जातो.
ट्रायने एक नवीन डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अॅप देखील लाँच केले आहे. या अॅपद्वारे, तुम्ही स्पॅम मॅसेज ब्लॉक करू शकता, तक्रारी नोंदवू शकता आणि त्यावर केलेली कारवाई पाहू शकता. टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन्स (TCCCPR) मध्ये बदल करून, TRAI ने ग्राहकांना त्यांची पसंती नोंदवल्याशिवाय UCC विरुद्ध तक्रार करण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी, ग्राहकांना कॉमर्शियल कम्युनिकेशंस ब्लॉक करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या पसंती नोंदवाव्या लागत होत्या. आता हे करण्याची गरज नाही.
हे बदललेले नियम फक्त टेलिकॉम नेटवर्कद्वारे येणाऱ्या मेसेज आणि कॉल्सना लागू होतील. व्हॉट्सअॅप सारख्या ओटीटी अॅप्सद्वारे येणारे मेसेज आणि कॉल या नियमांतर्गत येणार नाहीत. नवीन नियमांवरील चर्चेदरम्यान अनेकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
Mumbai Tech Week च्या तारखा जाहीर, या दिवशी होणार आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट! वाचा वेळापत्रक
ट्रायने दूरसंचार कंपन्यांना कॉल आणि एसएमएसच्या पॅटर्नचे विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत. जसे की असामान्यपणे जास्त कॉल्स, कमी कालावधीचे कॉल्स, सिम कार्ड वारंवार बदलणे, इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सचे कमी प्रमाण, या सर्वांमुळे स्पॅमर्सना त्वरित ओळखले जाऊ शकते आणि त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे सामान्यांची स्पॅमर्सपासून सुटका होणार आहे.
पूर्वी ग्राहकांना यूसीसी मिळाल्यानंतर 3 दिवसांच्या आत तक्रार दाखल करावी लागत असे. आता ग्राहक 7 दिवसांच्या आत तक्रार नोंदवू शकतात. दूरसंचार कंपन्यांना आता 30 दिवसांऐवजी 5 दिवसांच्या आत नोंदणी नसलेल्या क्रमांकांवरून येणाऱ्या यूसीसीवर कारवाई करावी लागेल.