108MP कॅमेरा आणि 8GB रॅम... कसा आहे Redmi चा लेटेस्ट Smartphone! किंमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
टेक कंपनी Xiaomi च्या स्मार्टफोन ब्रँड Redmi ने त्यांचा नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आलेला Redmi 13x स्मार्टफोन बजेट किंमतीत उपलब्ध आहे. नवाकोरा स्मार्टफोन मीडियाटेक प्रोसेसर, 108 मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा आणि 8 जीबीपर्यंत रॅमला सपोर्ट करतो. स्मार्टफोनची किंमत 16 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Redmi ने लाँच केलेला हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
गेल्या अनेक दिवसांपासून Redmi 13x बद्दल चर्चा सुरु होती. हा आगामी स्मार्टफोन कसा असणार, त्याचे फीचर्स कसे असणार, त्याची किंमत काय असणार, याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता अखेर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. कारण सर्वांना प्रतिक्षा असलेला Redmi 13x अखेर लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन सध्या जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्याची भारतात एंट्री कधी होणार, भारतात हा स्मार्टफोन कोणत्या नावाने लाँच केला जाणार, त्याची किंमत काय असणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र भारतातील युजर्सना Redmi 13x ची प्रतिक्षा आहे. (फोटो सौजन्य – X)
Redmi 13x 4G स्मार्टफोन 128GB स्टोरेजसह दोन रॅम पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा 6 जीबी व्हेरिअंटची किंमत VND 4,290,000 म्हणजेच सुमारे 14,300 रुपये आणि 8 जीबी व्हेरिअंटची किंमत VND 4,690,000 म्हणजेच सुमारे 15,590 रुपये आहे.
Redmi 13x स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिझोल्यूशन 1800 × 2400 पिक्सेल आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल सेटअप दिसतो. यासोबतच, डिस्प्लेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि कमाल ब्राइटनेस 550nits आहे.
Redmi चा हा नवीनतम फोन मीडियाटेकच्या हेलियो G91 अल्ट्रा ऑक्टा कोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. व्हिएतनाममध्ये लाँच झालेला हा फोन 6GB आणि 8GB रॅम पर्यायांसह आणला गेला आहे. दोन्ही मॉडेल्स 128 जीबी स्टोरेजसह येतात. यासोबतच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Redmi 13x मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे, ज्यामध्ये 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
नवीनतम Redmi 13x 4G स्मार्टफोनमध्ये 5030mAh बॅटरी आहे, जी 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याला 3.5 मिमी ऑडिओ चेक, ड्युअल-सिम आणि ब्लूटूथ 5.3 सारख्या वैशिष्ट्यांसह IP53 रेटिंग देण्यात आले आहे.