30 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत हे 3 स्मार्टफोन्स, असे आहेत स्पेसिफिकेशन्स
टेक कंपन्यांनी मिड रेंजमध्ये अनेक नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. काही स्मार्टफोन्सची किंमत बजेट रेंजमध्ये आहे, तर काही स्मार्टफोन्सची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे डिझाइन आणि परफॉर्मंसच्या बाबतीत युजर्सना अतिशय चांगला अनुभव देतात. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 30 हजार रुपयांपर्यंत असेल तर आता आम्ही तुम्हाला 3 जबरदस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. हे असे स्मार्टफोन्स आहेत जे उत्तम कॅमेरा सेटअप आणि चांगली कामगिरी ऑफर करतात.
जर तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Galaxy M56 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. या फोनमध्ये अनोखे डिझाईन आहे. या फोनमध्ये 6.74 इंच सुपर एमोलेड प्लस, 120Gz वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP+8MP+2MP ट्रिप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये Exynox 1480 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर 5000mAh बॅटरी देखील आहे. हा फोन One UI 7 वर आधारित Android वर चालतो. या फोनची किंमत 27,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iQOO चा NEO 10 स्मार्टफोन देखील तुमच्यासाठी एक उत्तम डिव्हाईस ठरू शकतो. या स्मार्टफोनचे डिझाईन तरूणांना नक्की आवडेल. या फोनमध्ये 6.78 इंच एमोलेड,120Hz वाला डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP+8MP ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिल्टन आहे, तर सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर आहे. यात 7000 mAh बॅटरी पॅक आहे. हा फोन Funtouch OS 15 वर आधारित Android वर काम करतो. त्याच्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.
पोकोचा F7 स्मार्टफोन त्याच्या साध्या डिझाइनमुळे ग्राहकांना खूप आवडतोय. या फोनमध्ये 6.83 इंचाचा OLED, 120Hz डिस्प्ले आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी, यात 50MP + 8MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर 20MP फ्रंट कॅमेरा आहे. परफॉर्मंससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर आहे. यात 7550 mAh बॅटरी पॅक आहे. हा फोन HyperOS 2.0 वर आधारित Android वर काम करतो. त्याच्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.