Amazon Diwali Sale 2025: हीच आहे बेस्ट Deal! अमेझॉनचा दिवाळी सेल ठरला हिट, महागडे स्मार्टफोनही झाले स्वस्त
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक महागड्या स्मार्टफोन्सवर मोठं डिस्कऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे सेलमध्ये या स्मार्टफोन्सची किंमत आणखी कमी झाली आहे. आतापर्यंत तुम्ही जो स्मार्टफोन तुमच्या कार्टमध्ये केवळ अॅड केला होता, तो स्मार्टफोन आता खरेदी करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला स्वत:साठी फोन खरेदी करायचा असेल किंवा कोणाला स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल, हा सेल तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण या सेलमध्ये लाखो रुपयांचे फोन देखील अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. चला तर मग फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्स डिल्सबद्दल जाणून घेऊया.
सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइटवर Samsung Galaxy S24 Ultra 5G या स्मार्टफोनची किंमत एक लाख रुपयांहून जास्त आहे. मात्र अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 मध्ये हा स्मार्टफोन केवळ 75,749 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच स्क्रीनवाल्या या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP प्राइमरी लेंस वाला क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा आयफोन गेल्यावर्षी 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता या आयफोनची किंमत अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 मध्ये 66,900 रुपये झाली आहे. या आफोनमध्ये 6.1 इंच डिस्प्ले आणि 48MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. या आयफोनमध्ये कंपनीने अॅपलचा A18 चिपसेट दिला आहे. जो अॅप्पल इंटेलीजेंस आणि मल्टीटास्किंग अगदी सहजपणे हाताळण्यासाठी सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनची किंमत 72,999 रुपये आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी सेल 2025 मध्ये या स्मार्टफोनची किंमत 63,999 रुपये झाली आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे आणि या फोनमध्ये 50MP प्रायमरी लेंसवाला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे जी 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
80 हजार रुपयांत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन 70,400 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की या फोनवर सुमारे 10,000 रुपयांची थेट सूट मिळत आहे. यात गुगलची टेन्सर G5 चिप आणि अपग्रेडेड ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात जेमिनी एआय फीचर्स देखील आहेत.