Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल
लिफ्टमध्ये मोबाईल सिग्नल ब्लॉक करण्याच्या काही प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे लिफ्ट निर्माण करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री. विटा, काँक्रिट आणि स्टेनलेस स्टीलचा वापर करून लिफ्ट तयार केली जाते. ही सर्व सामग्री सिग्नल ब्लॉक करते. अशी सामग्री जी पाऊस, ओलावा आणि बर्फाला थांबवू शकते, ती सामग्री तितक्याच प्रभावीपणे मोबाईल सिग्नल ब्लॉक करण्यासाठी देखील काम करते. हे साहित्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल शोषून घेऊ शकते किंवा परावर्तित करू शकते, ज्यामुळे नेटवर्क पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
कोणत्याही इमारतीचा लिफ्ट शाफ्ट (लिफ्टच्या आतील भाग) वीट, सिमेंट आणि काँक्रिटने तयार केला जातो. यानंतर स्टेनलेस स्टीलचा वापर करून लिफ्टचे कॅबिनेट तयार केले जाते. लिफ्ट कॅबिनेटच्या भिंती बहुस्तरीय असतात. लिफ्टला तुम्ही एखाद्या मोठ्या पिंजऱ्याप्रमाणे समजू शकता. फॅरेडे पिंजरा ही अशी एक रचना असते जी बाह्य विद्युत लहरींना आत जाण्यापासून रोखते. लिफ्ट पूर्णपणे धातूने वेढलेली असल्यामुळे, मोबाईल टॉवर्समधून येणारे सिग्नल योग्यरित्या आत प्रवेश करू शकत नाहीत आणि लिफ्टमधील माणसांना सिग्नल मिळत नाही. लिफ्ट सहसा ईमारतीच्या मध्यभागी किंवा आतील बाजूला असते. जिथे आधीपासूनच सिग्नल कमकुवत असतो. या भागांमध्ये जेव्हा धातूचा थर जोडला जातो, तेव्हा लिफ्टमधील सिग्नल संपुष्टात येतो.
केवळ लिफ्टचं नाही तर ऊंच ईमारतींच्या मोठ्या काँक्रीट भिंती आणि बेसमेंट देखील नेटवर्कवर परिणाम करतात. जर बिल्डींगमध्ये सिग्नल बूस्टर किंवा इन-बिल्डिंग नेटवर्क सिस्टमचा वापर केला नसेल तर ही समस्या अधिक वाढू शकते. याशिवाय, जेव्हा एकाच वेळी लिफ्टमधील अनेक लोकं नेटवर्कचा वापर करतात, त्यावेळी उपलब्ध असलेला सिग्नल आणखी कमजोर होतो. लिफ्टमध्ये मजबूत नेटवर्क मिळणं अत्यंत कठीण आहे. मात्र जर तुम्ही 4G किंवा 5G सपोर्ट वाला फोन आणि अपडेटेड सॉफ्टवेयरचा वापर केला तर तुम्हाला काही प्रमाणात नेटवर्कचा वापर करता येईल. तसेच जर ईमारतींमध्ये सिग्नल बूस्टर लावले तर ही समस्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.






