घरबसल्या युट्यूबवरून लाखो रुपयांची कमाई करायची आहे? या गोष्टींमुळे पडेल पैशांचा पाऊस
लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचे जगभरात लाखो युजर्स आहेत. युट्यूब आपल्या मनोरंजनाचे साधन आहे. युट्यूबवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहू शकता, ज्यामध्ये शिक्षण, फूड, ट्रॅवल, व्लॉग्स अशा अनेकांचा समावेश असेल. असे अनेक लोक आहेत जे युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यासोबतच लाखो रुपयांची कमाई देखील करतात. यासाठी फक्त तुमच्याकडे टॅलेंट, स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही युट्यूबवरून दरमहा लाखो आणि करोडो रुपये कमवू शकता.
युट्यूबवरून कमाई करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे AdSense. ‘ॲडसेन्स फॉर यूट्यूब’ हा गुगलचा प्रोग्राम आहे. ज्याद्वारे क्रिएटर्स कमाई करू शकतात. येथे कमाई करण्यासाठी प्रथम काही निकषांचे पालन करावे लागेल. जर तुम्ही हे निकष पूर्ण केले, तर दर महिन्याला तुमच्या ॲडसेन्स अकाऊंटमध्ये व्ह्यूजच्या आधारे पैसे पाठवले जातात. ॲडसेन्स प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी, तुमच्या युट्यूब चॅनेलवर 1000 सब्सक्राइबर आणि 4000 तास वॉचटाइम असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
असे बरेच क्रिएटर्स आहेत जे युट्यूबच्या Adsense प्रोग्राम अंतर्गत कमी कमावतात, परंतु स्पॉन्सरद्वारे चांगली रक्कम कमावतात. तुमच्या चॅनेलवर सब्सक्राइबरची संख्या अधिक असल्यास, ब्रँड तुम्हाला जाहिरातीसाठी पैसे देतात.
क्रिएटर्सना यूट्यूब शॉपिंगच्या मदतीने पैसे कमविण्याचा एक मार्ग देखील आहे. यूट्यूब शॉपिंग एफिलियेट प्रोग्रामच्या अटी पूर्ण करून तुम्हाला हा लाभ मिळतो. एखाद्या वापरकर्त्याने क्रिएटर्सच्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरून खरेदी केल्यास, क्रिएटर्सला त्यावर निश्चित कमिशन मिळते.
क्रिएटर्सना सुपर चॅट आणि मेंबरशिपमधून कमाई करण्याची संधी देखील आहे. अशी अनेक चॅनेल आहेत ज्यावर कंटेटमध्ये प्रवेश करण्यासाठी मेंबरशिप आवश्यक आहे. त्याच वेळी, निर्माते सुपर चॅटद्वारे चांगली कमाई देखील करतात. लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान, वापरकर्ते सुपर चॅटद्वारे पैसे पाठवतात.
Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित
युट्यूब त्यांच्या युजर्सना फ्री आणि प्रिमियम असे दोन्ही प्लॅन्स ऑफर करते. जर तुम्ही साध्या युजरप्रमाणे युट्यूबवर व्हिडीओ पाहत असाल तर तुम्हाला जाहिरातींचा त्रास सहन करावा लागणार. सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे व्हिडीओ पाहण्याची मज्जा जाते आणि खूप वैताग येतो. पण तुम्ही प्रिमियम युजर असाल तर तुम्ही जाहिरांतीशिवाय व्हिडीओ पाहण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. युट्यूबच्या मंथली, क्वार्टली आणि अॅनुअल प्रीपेड प्लॅनच्या किंमती 159 रुपये, 459 रुपये आणि 1490 रुपयांपासून सुरु होतात.