नादच खुळा! राजस्थानी आजीच्या रायडिंग स्किलसमोर सर्व काही फेल; गिअर टाकला अन् थेट धुरळा उडवला, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय आहे आश्चर्यकारक?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की राजस्थानमधील दृश्य दिसत आहे. एक आजी बाईक घेऊन उभी आहे. तिच्या मागे आणखी दोन आजीबाई बसल्या आहे. आता आश्चर्यकार बाब म्हणजे, एक आजोबा देखील बाईकवर बसले आहे. आजी देखील डोळ्यावर चष्मा लावून स्वॅगमध्ये बाईक स्टार्ट करुन धुरळा उडवत सुटली आहे. आजींचा हा स्वॅग पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे आजींच्या चेहऱ्यावर कोणताही संकोच किंवा भिती नाही. मोठ्या आत्मविश्वासाने त्या बाईक चालवत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
ओ देख लो सा! म्हारी राजस्थानी दादियाँ रो जलवो… 🛵🔥🤣 pic.twitter.com/CCehrJrCgG — Shiksha News Rajasthan (@ShikshaNewsRaj1) February 25, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ShikshaNewsRaj1 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर आजींचे कौतुकास्पद कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी आजी तुमच्यासमोर सर्व रायडर्स फेल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आजींचा नादच खुळा आहे असे म्हटले आहे. आणखी एकाने हौसेला वयाचे बंधन नसते असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ओ देख लो सा! म्हारी राजस्थानी दादियाँ रो जलवो… असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






