Google Map Update: गुगल मॅपचा वापर करताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पश्चाताप कराल
नेव्हिगेशन अॅप गुगल मॅप आपल्यासाठी जेवढा फायद्याचा आहे, तेवढाच धोकादायक देखील आहे. गुगल मॅपमुळे अपघात झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, गुगल मॅपच्या चुकीच्या नेव्हिगेशनमुळे लोकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला आहे. नुकतीच उत्तर प्रदेशातील तिघांचा गुगल मॅपच्या चुकीच्या नेव्हिगेशनमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशा परिस्थितीत गुगल मॅप वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी रात्री उशीरा गाडी रामगंगा नदीत पडल्याने तिघांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चालक गुगल मॅपवर दाखवलेल्या मार्गानुसार गाडी चालवत होता. यावेळी त्याने मॅपवर दाखवल्याप्रमाणे गाडी रामगंगा नदीवरील पुलावर नेली. मात्र हा पूल तुटला असल्याने गाडी नदीत पडली आणि गाडीमधील तिघांचा मृत्यू झाला. आपण देखील अनेकदा प्रवासात गुगल मॅपचा वापर करतो. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरेजचं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कमकुवत इंटरनेटच्या बाबतीत, गुगल मॅप तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे नेहमी चांगले इंटरनेट कनेक्शन ठेवा. तसेच, गुगल मॅप वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अनेकदा असे दिसून येते की नकाशात अशा ठिकाणी चुकीचे मार्ग दाखवले जातात जे फारसे सामान्य नाहीत आणि नवीन आहेत. अशा परिस्थितीत तेथील लोकांकडून मार्गाची योग्य माहिती मिळवणे हाच उत्तम मार्ग आहे.






