या Windows यूजर्सवर हॅकर्सची नजर, मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता! सुरक्षेसाठी आत्ताच करा हे काम
टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ते या वर्षाच्या अखेरीस विंडोज 10 पीसीचा सपोर्ट बंद करणार आहे. ऑक्टोबर 2025 नंतर विंडोज 10 चा सपोर्ट बंद केला जाणार आहे. ज्यामुळे जे युजर्स विंडोज 10 चा वापर करत आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्यांचे संगणक अपग्रेड करावेत, असा सल्ला मायक्रोसॉफ्टने दिला आहे. मायक्रोकॉफ्टने घेतलेल्या या निर्णयाचा लाखो युजर्सवर परिणाम होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर हॅकर्स विंडोज 10 वापरणाऱ्या युजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतात.
ऑक्टोबर 2025 नंतर, मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 चालवणाऱ्या संगणक आणि लॅपटॉपला कोणतीही सुरक्षा अपडेट आणि तांत्रिक सपोर्ट प्रदान करणार नाही. यामुळे हॅकर्सना अशा सिस्टमला लक्ष्य करणे सोपे होईल. मायक्रोसॉफ्टने असेही म्हटले आहे की सपोर्ट संपल्यानंतर व्हायरस आणि मालवेअरद्वारे सिस्टमवर हल्ला करणे सोपे होईल. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीने सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्ट या वर्षाच्या अखेरीस विंडोज 10 पीसीचा सपोर्ट बंद करणार आहे. लाखो विंडोज 10 वापरकर्त्यांनी त्यांचे संगणक शक्य तितक्या लवकर अपग्रेड करा आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत प्रतीक्षा करू नका. सायबर सिक्युरिटी फर्म ESET ने याबाबत माहिती दिली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की हॅकर्स अशा लोकांना टार्गेट करू शकतात ज्यांचे सिस्टम सिक्युरिटी सपोर्ट येत्या काही महिन्यांत संपुष्टात येईल. ज्यामुळे युजर्सचा डाटा लिक होऊन त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
ESET मधील सुरक्षा तज्ज्ञ म्हणाले की, ‘आम्ही सर्व वापरकर्त्यांना ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा न करता विंडोज 11 वर त्वरित अपग्रेड करण्याचा सल्ला देत आहोत. त्यांचे डिव्हाइस विंडोजच्या नवीनतम आवृत्तीमध्ये अपग्रेड केले जाऊ शकत नसल्यास, त्यांनी दुसरी ऑपरेटिंग सिस्टम निवडावी. परतुं जुन्या विंडोज सिस्टमवर कामं करणं धोकादायक ठरू शकतं. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जर तुम्हाला मोठे डिजिटल धोके टाळायचे असतील, तर तुम्ही लगेच विंडोज अपडेट करा.
60 टक्क्यांहून अधिक विंडोज पीसी जुन्या विंडोज 10 आवृत्तीवर अवलंबून आहेत. ही परिस्थिती विंडोज 7 वरून विंडोज 10 मध्ये अपग्रेड करण्यापेक्षा अगदी वेगळी आहे. कंपनीने TPM 2.0 च्या आवश्यकतेमुळे लाखो पीसीसाठी मोफत विंडोज 11 अपग्रेड करण्याचा मार्ग बंद केला आहे आणि सध्याची विंडोज मार्केट परिस्थिती अशी आहे की पुढील पीसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील.
विंडोज हा एकमेव पर्याय नाही. जर एखाद्याला कोणत्याही कारणास्तव विंडोज अपडेट करता येत नसेल तर वापरकर्ते सहजपणे मॅक खरेदी करू शकतात किंवा त्यांना ज्ञान आणि स्वारस्य असल्यास लिनक्स देखील वापरू शकतात. सुरक्षा धोके नेहमी लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि ESET फक्त या वापरकर्त्यांना चेतावणी देत आहे जेणेकरून ते कोणत्याही मोठ्या समस्या टाळू शकतील. भारतासारख्या देशात विंडोज 11 अपग्रेडची स्थिती वेगळी असू शकते. इथली इकोसिस्टम वेगळी आहे आणि लोक त्यांच्या कॉम्प्युटरवर या ऑपरेटिंग सिस्टीम चालवण्यासाठी स्वस्त पर्याय शोधू शकतात.