X लवकरच बनणार Super App! Online Payment आणि टीव्ही सारखे फीचर्स देण्याची तयारी सुरु, काय आहे कंपनीचा प्लॅन
एलोन मस्कच्या मालकीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स नवीन वर्षात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती, की एक्स आता लवकरच सुपर अॅप होणार आहे. या एका अॅपमध्ये युजर्सना सर्व सुविधा मिळणार आहेत. आता या सुपर अॅपची तयारी सुरु झाली आहे. कंपनीने एक्समध्ये नवीन फीचर्स अॅड करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता एक्स युजर्सना लवकरच ऑनलाईन पेमेंट आणि टिव्ही सारख्या फीचर्सचा अॅपवर लाभ घेता येणार आहे.
OnePlus 13 Series अखेर भारतात लाँच, 6000 mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज! इतकी आहे किंमत
2025 च्या सुरुवातीलाच एक्सवर मनी ट्रान्सफर आणि टीव्ही सारखे फीचर्स अॅड केले जाणार आहेत. ज्यामुळे सुपर ॲप बनण्याच्या प्रक्रियेत एक्स एक पाऊल पुढे आला आहे. या फीचर्ससोबतच AI चॅटबॉट Grok मध्ये अनेक नवीन अपग्रेड देखील उपलब्ध असतील. एलोन मस्कने सांगितलं होतं की त्याला एक्सला सुपर ॲप म्हणजेच ‘एव्हरीथिंग ॲप’ बनवायचे आहे. याचा अर्थ एकाच ठिकाणी युजर्सना सर्व सुविधा मिळणार आहेत. जेणेकरुन वापरकर्त्यांना कोणत्याही सेवेसाठी इतर कोणतेही ॲप शोधावे लागणार नाही. आता एव्हरीथिंग ॲप बनण्याची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच नवीन फीचर्स युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
कंपनीच्या नवीन वर्षाच्या योजनांची घोषणा करताना, X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी सांगितले की 2024 मध्ये X ने जग बदलले होते. आता तुम्हीच मीडिया आहात. 2025 मध्ये तुम्हाला पूर्णपणे नवीन मार्गांनी जोडेल. या वर्षी X TV, X Money, Grok आणि बरेच काही येत आहे. या सर्व नवीन गोष्टींसाठी तयार व्हा. हे दर्शविते की कंपनीने 2025 साठी तयारी केली आहे. 2025 मध्ये एक्स एका नव्या शिखरावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे.
एक्सवर युजर्सना ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा मिळावी यासाठी कंपनी लवकरच मनी ट्रान्सफर सेवा देखील सुरु करणार आहे. त्याच्या पेमेंट सेवेसाठी, कंपनीने या महिन्यात @XMoney नावाचे अधिकृत अकाऊंट देखील तयार केले आहे. आतापर्यंत त्याचे 1.53 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या सेवेबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु लोकांचा असा विश्वास आहे की यामध्ये Dogecoin इत्यादी डिजिटल मालमत्तांचा समावेश केला जाऊ शकतो.
Motorola चा बजेट फ्रेंडली 4G स्मार्टफोन लाँच, कमी किंमतीत मिळणार सर्वोत्कृष्ट फीचर्स
हे X प्लॅटफॉर्मवरील मल्टीमीडिया अनुभव बदलेल. याबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही, मात्र त्यामुळे X वरील ऑडियो-विजुअल क्षमता वाढणार असल्याचे मानले जात आहे. यावर, वापरकर्त्यांना लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ऑन-डिमांड कंटेटची सुविधा मिळू शकते.
X चा Grok AI चॅटबॉट आधीच लाइव्ह आहे आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धा देत आहे. त्यात या वर्षात अनेक महत्त्वाचे अपडेट्स पाहता येतील.