Samsung ने या Galaxy सीरीजसाठी बदलली सिक्योरिटी अपडेट पॉलिसी, तुमचा फोन तर लिस्टमध्ये नाही ना?
स्मार्टफोन कंपनी Samsung ने त्यांच्या Samsung Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्सच्या अपडेटबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने Samsung Galaxy S21 सिरीजसाठी सिक्योरिटी अपडेट पॉलिसी बदलण्याचं ठरवलं आहे. Samsung Galaxy S21 सिरीजमध्ये Galaxy S21, Galaxy S21 Plus and Galaxy S21 Ultra या मॉडेल्सचा समावेश आहे. या सॅमसंग स्मार्टफोन्सना आता दर तिसऱ्या महिन्याला सुरक्षा अपडेट्स प्रदान केले जाणार आहे. यापूर्वी, कंपनी दरमहा या स्मार्टफोन्ससाठी सुरक्षा अपडेट्स जारी करत होती. मात्र आता या स्मार्टफोन्सना दर तिसऱ्या महिन्याला सुरक्षा अपडेट्स प्रदान केले जाणार आहे.
इटलीनंतर ‘या’ देशानेही DeepSeek AI वर घातली बंदी, आता सरकारी डिव्हाईसमध्ये नाही होणार वापर
सॅमसंगने त्यांच्या मोबाइल सुरक्षा वेबसाइटवर याबद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये Galaxy S21 सिरीज लाँच केली होती. ज्यामध्ये Galaxy S21, Galaxy S21 Plus and Galaxy S21 Ultra या मॉडेल्सचा समावेश होता. युजर्सची सुरक्षा टिकून राहावी, त्यांचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी कंपनी दर महिन्याला या स्मार्टफोन्ससाठी सिक्योरिटी अपडेट लाँच करत होती. मात्र आता कंपनीने सांगितलं आहे की, दर 3 महिन्यांनी या स्मार्टफोनसाठी सिक्योरिटी अपडेट जारी केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग Galaxy S21 मालिकेतील स्मार्टफोन वापरकर्त्यांना कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. त्यांना आता दर महिन्याऐवजी दर तीन महिन्यांनी सुरक्षा अपडेट मिळतील. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या सिक्योरिटी अपडेट पॉलिसीमध्ये बदल केला असून मासिक सुरक्षा अपडेट्सची वारंवारता बदलली आहे. सॅमसंगने सात वर्षांसाठी त्यांच्या नवीन स्मार्टफोनसाठी अपडेट्स जारी करण्याचे आश्वासन दिले होते. आता, कंपनी Galaxy S21 मालिकेसह तिमाही सुरक्षा अपडेट्सची वारंवारता वाढवणार आहे. याचा अर्थ असा की आता या स्मार्टफोन सिरीजला दर तीन महिन्यांनी एकदा अपडेट मिळेल.
Samsung Galaxy S21 सीरीजच्या स्मार्टफोन्सना सुरक्षेसोबतच ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स देखील मिळणार आहेत. कंपनी लवकरच या फोनसाठी One UI 7 अपडेट रिलीज करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सॅमसंगने काही आठवड्यांपूर्वीच त्यांची नवीनतम फ्लॅगशिप Galaxy S25 सिरीज लाँच केली. यामध्ये गॅलेक्सी Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra या स्मार्टफोनचा समावेश आहे. या सॅमसंग फोन्सची ओपन सेल 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
जर तुम्ही देखील Samsung Galaxy S21 सीरीज स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमचे डिव्हाइस अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर ही सर्वोत्तम वेळ आहे. नुकतीच कंपनीने त्यांची नवीन फ्लॅगशिप सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
Samsung Galaxy S25 सिरीजमधील व्हॅनिला व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 80 हजार रुपये आहे. यासोबतच, फोनचे दुसरे मॉडेल Galaxy S25 प्लस आहे. कंपनीने हा फोन सुमारे 1 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. जर आपण सॅमसंगच्या फ्लॅगशिप Galaxy S25अल्ट्रा स्मार्टफोनबद्दल बोललो तर तो 1,29,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.