Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
Zomato चे को-फाउंडर दीपिंदर गोयल यांनी कान आणि डोळ्यांच्या मधील ‘टेम्पल’ स्पेसमध्ये एक चमकतं डिव्हाईस परिधान केलं होतं. यामुळे या डिव्हाईसला ‘Temple’ डिव्हाईस असं म्हटलं जात आहे. तथापी हे एक एक्सपेरिमेंटल डिव्हाईस आहे, जे रिअल टाइममध्ये मेंदूच्या रक्ताभिसरण प्रवाहाचे मोजमाप करते. या पर्सनल रिसर्चसाठी दीपिंदर गोयल यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत. याबाबत दीपिंदर गोयल यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती शेअर केली होती. हे डिव्हाईस दीपिंदर गोयल यांच्या ‘ग्रेविटी एजिंग हाइपोथिसिस’ रिसर्च इनिशिएटिवचा एक भाग आहे. ज्यासाठी 25 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 225 करोड रुपयांचे पर्सनल फंड इन्वेस्ट केले जाणार आहे. झोमॅटो को-फाउंडर ने सांगितलं की, हे कोणतेही प्रोडक्ट नाही आहे. हे एक प्रकारचे एक्सपेरिमेंटल डिव्हाईस आहे. ज्याचा ग्रेविटी एजिंग हाइपोथिसिस रिसर्चसाठी वापर केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
I’m not sharing this as the CEO of Eternal, but as a fellow human, curious enough to follow a strange thread. A thread I can’t keep with myself any longer. It’s open-source, backed by science, and shared with you as part of our common quest for scientific progress on human… pic.twitter.com/q2q3tRj3Jd — Deepinder Goyal (@deepigoyal) November 15, 2025
नोव्हेंबर 2025 मध्ये दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर गुरुत्वाकर्षणाच्या कमी होण्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवरील संशोधन शेअर केले. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, मी हे इटरनलचे सीईओ म्हणून नाही तर एका विचित्र धाग्याचे अनुसरण करण्यास उत्सुक असलेल्या एका माणूस म्हणून शेअर करत आहे. हा धागा मी आता स्वतःपुरताच ठेवू शकत नाही. हे एक ओपन सोर्स रिसर्च आहे, ज्याला विज्ञानाने मान्य केलं आहे. ग्रेविटी हाइपोथिसिसबद्दल दीपिंदर गोयल यांनी पुढे सांगितलं की, न्यूटनने आपल्याला हा शब्द दिला आहे.
Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ग्रेविटी म्हणजेच गुरुत्वाकर्षणमुळे ब्रेनमध्ये ब्लड फ्लो हळू होतो, ज्यामुळे ब्रेन एजिंगची समस्या येते. मानवांमध्ये, मेंदू वरच्या बाजूला असतो, ज्यामुळे हृदयाला रक्त वर ढकलणे कठीण होते कारण ते गुरुत्वाकर्षणामुळे सतत खाली पडत असते. मात्र कालांतराने जेव्हा वय वाढते, त्यासोबतच ब्लड फ्लो किंवा सर्कुलेशन देखील कमी होते. एजिंग ब्रेनमुळे शरीरही वेगाने वृद्ध होते. रिसर्चमध्ये सांगितलं आहे की, वय वाढण्यासोबतच मानवांच्या शरीरात अनेक हेल्थ कम्प्लिकेशन्स सुरु होतात, ज्यामध्ये वाइटल फंक्शन कंट्रोल समाविष्ट आहे.
Ans: Zomato ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट सर्च प्लॅटफॉर्म आहे.
Ans: Zomato ची स्थापना 2008 मध्ये झाली.
Ans: दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा हे Zomato चे को-फाउंडर आहेत.






