(फोटो सौजन्य: istock)
आजच्या या डिजिटल युगात स्मार्टफोन ही आपली रोजची गरज बनली आहे. आपली अनेक कामे आपण आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने करत असतो. मग ती वैयक्तिक असो वा व्यावसायिक, स्मार्टफोनच्या मदतीने आपण सहज आणि सोप्या पद्धतीने ही कामे घरबसल्या करू शकतो. एवढेच काय तर यात आपल्या मनोरंजनाचीही अनेक साधने उपलब्ध आहेत.
आजकाल स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण काहीवेळा स्मार्टफोन जास्त गरम होणे ही एक मोठी समस्या बनते. हे केवळ डिव्हाइसच्या कार्यक्षमतेवरच परिणाम करत नाही तर बॅटरीचे आयुष्य देखील कमी करू शकते. जर तुमचा स्मार्टफोन देखील वारंवार गरम होत असेल तर ते काही सामान्य चुकांमुळे असू शकते. आज अय लेखात आप ण स्मार्टफोन ओव्हरहीटिंगची कारणे आणि या समस्येला दूर करण्यासाठीचे काही उपाय जाणून घेणार आहोत.
कॉलवर बोलनाता Background Noise चा त्रास होतोय? Android चे हे फिचर तुमची मदत करेल
दीर्घकालीन वापर:
सतत गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे किंवा हेवी ॲप्स वापरणे यामुळे फोन गरम होऊ शकतो. प्रोसेसरवर जास्त दबाव जास्त गरम होण्यास कारणीभूत ठरतो
चार्जिंग करताना फोनचा वापर:
फोन चार्ज करताना अनेक लोक कॉलिंग, ब्राउझिंग किंवा गेमिंग करतात. असे केल्याने, बॅटरी आणि प्रोसेसरवरील लोड एकाच वेळी वाढतो, ज्यामुळे फोन गरम होत
हेवी ॲप्स आणि गेम्सचा वापर:
हेवी-ग्राफिक्ससह गेम आणि हेवी ॲप्स प्रोसेसर आणि GPU वर अधिक भार टाकतात, ज्यामुळे आपला स्मार्टफोन अधिक गरम होत असतो
हाय ब्राइटनेसचा वापर:
स्क्रीनचा ब्राइटनेस जास्तीत जास्त ठेवल्याने बॅटरी लवकर संपते आणि डिव्हाइस गरम होऊ लागते
खराब नेटवर्क सिग्नल:
जेव्हा कमकुवत नेटवर्क सिग्नल असतो, तेव्हा फोन सतत सिग्नल शोधत राहतो, ज्यामुळे बॅटरी आणि प्रोसेसर गरम होतात
सूर्याचा प्रकाश:
फोन गरम वातावरणात किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवल्याने डिव्हाइस लवकर गरम होऊ शकते
चॅटजीबीटीचे गुगलला आव्हान! आता ChatGPT Search वापरण्यासाठी युजर्सना लॉगिन करावे लागणार नाही
चार्जिंग करताना वापर टाळा:
चार्जिंग करताना फोन रेस्ट मोडमध्ये ठेवा
जड ॲप्स कमी वापरा:
गरज नसल्यास, बॅकग्राउंडमध्ये चालणारी ॲप्स बंद करा
केस काढा:
फोन जास्त गरम होत असल्यास, कव्हर किंवा केस काढा
थंड ठिकाणी ठेवा:
फोन थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवू नका
सॉफ्टवेअर अपडेट करा:
तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा, कारण जुन्या व्हर्जन्समुळे जास्त गरम होऊ शकते. स्मार्टफोन जास्त गरम होणे सामान्य आहे, परंतु ते पुन्हा पुन्हा झाल्यास ते तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकते. या छोट्या चुका दुरुस्त करून, तुम्ही तुमच्या फोनला जास्त गरम होण्यापासून वाचवू शकता आणि त्याची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता.