50 मेगापिक्सेल कॅमेरा 5500mAh बॅटरी; OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर तुम्हाला OnePlus 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ऑफर केला जात आहे. OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन ऑफर्स, डिस्काऊंट आणि बँक सवलतींसह उपलब्ध आहे.
Gemini 2.0 Flash Thinking: Google चं नवीन AI मॉडल लाँच, जाणून घ्या खास फीचर्स
OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन कंपनीने 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला. सध्या, हा फोन फक्त 16,999 रुपयांना खरेदी करता येईल, म्हणजेच OnePlus चा परवडणारा 5G स्मार्टफोन 3000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. 3000 रुपयांची सूट मिळविण्यासाठी, तुम्हाला काही बँक कार्डांचा वापर करून पेमेंट करावे लागेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन 17,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर Amazon India 2000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे, त्यामुळे या फोनची किंमत 17,999 रुपये होते. तसेच काही निवडक बँक कार्डांच्या मदतीने पेमेंट केल्यास तुम्ही या स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळवू शकता.
या OnePlus फोनवर RBL, OneCard, Federal Bank आणि BOBCARD क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय, जर तुम्ही ICICI आणि HDFC डेबिट किंवा ATM कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला फक्त 750 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डने हा फोन 17,249 रुपयांना खरेदी करता येईल.
OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वरून 3000 रुपयांच्या मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. यासोबतच, जर तुम्हाला अतिरिक्त सूट हवी असेल तर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता.
डिस्प्ले: OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. या फोनच्या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 2100 निट्स आहे.
प्रोसेसर आणि ओएस: हा वनप्लस फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित ऑक्सिजनओएस 14.0 वर चालतो, ज्याला दोन वर्षांसाठी अपडेट्स मिळतील.
रॅम आणि स्टोरेज: हा वनप्लस फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच, फोन 8 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो.
DeepSeek चं काळ सत्य उघड! चीन सरकारला पाठवला जातोय सर्व डेटा, नेमकं प्रकरण काय?
कॅमेरा: या वनप्लस फोनमध्ये 50 एमपी ड्युअल रियर कॅमेरा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (ईआयएस) सपोर्टसह येतो. यासोबतच, 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: या फोनमध्ये 5500 mAh बॅटरी आणि 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग आहे.